प्रा.सारिका लाटवडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.
प्रा.सारिका लाटवडे यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी.
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क–
येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापिका प्रा. सारिका लाटवडे यांना शिवाजी विद्यापीठाने नुकतेच पीएच.डी. पदवीने सन्मानित केले. विरवडे, ता. कराड येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रा. सारिका लाटवडे यांनी ‘निवडक सरकारी योजनांचा सांगली जिल्ह्यावर झालेला परिणाम’ या विषयावर सखोल संशोधन करून सदरचा प्रबंध शिवाजी विद्यापीठास सादर केला होता. त्यास मान्यता देऊन विद्यापीठाने त्यांना पीएच.डी. पदवीने सन्मानित केले आहे. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथील अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.सौ.एस.एस राठोड यांनी त्यांना मार्गदर्शन केले. निवडक सरकारी योजनांमुळे सांगली जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेची विधायक वाटचाल या संशोधनातून प्रतिबिंबित होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या उर्जितावस्थेसाठी अशा योजनांची नितांत गरज त्यांनी या संशोधनाच्या आधारे स्पष्ट केली. या यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ, प्राचार्य सिताराम गवळी, संस्था सीईओ कौस्तुभ गावडे, प्रोफेसर प्राचार्य डॉ. सतीश घाटगे, डॉ. वर्षा शिंदे, डॉ.ए.के. पाटील, डॉ.एन.ए. पाटील, पती महेश शिंदे, सासू, सासरे, आई-वडील आदींनी त्यांचे अभिनंदन केले.