राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सादिक इनामदार
राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी सादिक इनामदार
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
सातारा जिल्हा राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्षपदी कराड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सादिक ईसाक इनामदार यांची निवड करण्यात आली आहे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी सादिक इनामदार यांना नियुक्तीपत्र दिले आहे.
सादिक इनामदार यांच्या राजकीय, सामाजिक कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हा अध्यक्षपदी सादिक इनामदार यांची निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. सादिक इनामदार यांच्या या निवडीबद्दल माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, अमित कदम, निवास शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या विश्वासात पात्र राहून अल्पसंख्याक सेलचे काम अधिक उठावदार करण्याच्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करीन अशी हमी नवनिर्वाचित अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सादिक इनामदार यांनी दिली आहे.