शामगावच्या विकासासाठी प्रयत्नशील : रामकृष्ण वेताळ
शामगावच्या विकासासाठी प्रयत्नशील :
रामकृष्ण वेताळ
शेतीच्या नवीन ट्रान्सफॉर्मर शुभारंभ
कराड : ग्राम दौलत न्यूज नेटवर्क–
शामगाव, ता. कराड येथील इनाम डीपीवर कृषि पंपाचा लोड जास्त असल्याने शेतकऱ्यांना गेल्या दोन वर्षांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत होता. त्यासाठी भाजपचे राज्य किसान मोर्चाचे सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या प्रयत्नातून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून सुरु करण्यात आला.
यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली पोळ, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, कराड उत्तर सरचिटणीस बाळासाहेब पोळ, ग्रा. पं. सदस्य राहूल यादव, बंडा पोळ, तसेच शेतकरी पांडुरंग चव्हाण, गोविंद जाधव, बाबुराव पोळ, संतोष कणसे, सुनिल पोळ, भानुदास चव्हाण आदींसह शेतकरी उपस्थित होते.
रामकृष्ण वेताळ म्हणाले, तलाव क्रमांक तीनमध्ये नवीन ट्रान्सफॉर्मर शंभर के. व्ही. क्षमतेचा असल्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. याचबरोबर नवीन 25 पोलची लाईनही टाकण्यात आली आहे. गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहे. प्रास्ताविक बंडा पोळ यांनी केले. तर बाळासाहेब पोळ यांनी आभार मानले.