जीवनशैली

मरळी-भगतवाडी रस्त्याच्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये:मनोजदादा घोरपडे

मरळी-भगतवाडी रस्त्याच्या कामाचे फुकटचे श्रेय घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये:मनोजदादा घोरपडे
कराड: प्रतिनिधी –
स्वातंत्र्यपूर्व काळापासून रस्त्यापासून व अनेक सोयीसुविधा पासून वंचित असणाऱ्या पाल गावच्या पश्चिमेकडील इंजाईदेवीच्या डोंगरावरील भगतवाडी गावासाठी मुख्यमंत्री सडक ग्राम योजनेतून तब्बल 5 कोटी 47 लाख रुपयेचे खडीकरण डांबरीकरण विद्यमान महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मंजूर झाले असून या रस्त्याचा भूमिपूजन समारंभ दिनांक 5 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडला.
यावेळी बोलताना कराड उत्तरचे भाजपा नेते माननीय मनोज दादा घोरपडे यांनी सांगितले विद्यमान लोकप्रतिनिधींनी गेल्या 70 वर्षांमध्ये हा रस्ता झालेला नसताना सुद्धा याकडे कधीही लक्ष दिलेली नाही परंतु आज भाजपच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या रस्त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न विद्यमान लोकप्रतिनिधी करत आहेत परंतु कोणीही हे काम आपणच केल्याचा खोटा आव आणून या कामाचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये.
जवळजवळ 70 वर्षापासून प्रलंबित असलेल्या मरळी भगतवाडी रस्त्याच्या भूमिपूजन समारंभ प्रसंगी ते बोलत होते यावेळी भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस, सातारा लोकसभा समन्वयक माननीय रामकृष्ण वेतन साहेब यांनी बोलताना विरोधकांनी आमच्या माध्यमातून झालेल्या कोणत्याही कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये जर विरोधकांनी खरंच हे काम केले असेल तर त्याचे पुरावे कधीही, कोणीही, कुठेही घेऊन यावीत आम्ही समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहोत असे सांगितले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशतात्या पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पाल ग्रामपंचायतच्या माध्यमातून आज अखेर झालेल्या 30 कोटींच्या विकास कामांचे थोडक्यात विवेचन केले तसेच गेली 25 वर्षे सत्तेत असताना पाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र असो अथवा आज भूमिपूजन झालेले मरळी भगतवाडी रस्ता असो ही कामे करण्याची सद्बुद्धी विरोधकांना का सुचली नाही असा प्रश्न उपस्थित केला.
सहकार ग्राम विकास पॅनलचे आधारस्तंभ उद्योजक माननीय मदन भाऊ काळभोर यांनी बोलताना विरोधकांनी गेल्या पंचवीस वर्षात जेवढी कामे केली नाहीत त्याच्या कित्येक पट कामे या तीन वर्षात करून दाखवल्याचे सांगताना येणाऱ्या दोन वर्षांमध्ये अजून बरीच कामे करायचे असून पाल व परिसराचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला.
भाजपचे तालुकाध्यक्ष शंकरकाका शेजवळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भविष्यात पक्षाची ध्येयधोरणे पाल व परिसरात राबवून राज्य व केंद्र शासनाच्या मार्फत जास्तीत जास्त विकासकामे पाल गावामध्ये करण्यासाठी प्रयत्नशील असलेले सांगितले. भाजपा कराड उत्तर किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत काका भोसले यांनी विरोधकांनी आज अखेर हे काम का केले नाही याची प्रथमता उत्तर द्यावे आणि आणि आज अखेर खबालवाडी गावचा रस्ता झाला परंतु भगतवाडी गावचा रस्ता का झाला नाही याचा सर्वांनी विचार करावा असे आवाहन केले.
मरळी भगतवाडी रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी कराड उत्तर चे भाजपा नेते माननीय मनोज घोरपडे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस व सातारा लोकसभा समन्वयक माननीय रामकृष्ण वेताळ साहेब, भाजपा जिल्हाउपाध्यक्ष सुरेश पाटील, मा. मदनभाऊ काळभोर, भाजपचे तालुकाध्यक्ष शंकरराव शेजवळ, किसान मोर्चाचे अध्यक्ष प्रशांत भोसले, ग्रामपंचायत राजचे अध्यक्ष संतोष पाटील, ग्रामविकास अधिकारी सुचित्रा मस्के, ठेकेदार उदय जाधव, कार्यकारी अभियंता युवराज देसाई, पाल गावच्या सरपंच सुनीता घाडगे, उपसरपंच गणेश खंडाईत, यात्रा कमिटी चेअरमन प्रशांत दळवी, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश जगताप, माजी उपसरपंच सुनील काळभोर, शिवराज पाटील, कल्याणी इंजेकर, तसेच सूर्यकांत पडवळ, मुकुंद गोळे, राहुल पाटील, सुरेश जाधव फौजी, मधुकर ढाणे, सुरेश नागे, दादासो काळभोर, मनोहर साळुंखे, सुहास गोरे, देवराज पाटील, दादा पाटील, अरुण पाटील, अविनाश पाटील, पंडित इंजेकर, प्रकाश साळुंखे, अण्णा साळुंखे, बबन भोसले, हणमंत साळुंखे, विलास साळुंखे, जगन्नाथ साळुंखे, आबा साळुंखे पाल व भगतवाडी ग्रामस्थ तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश इंजेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »