श्री.संतकृपा कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन
कराड : प्रतिनिधी –
श्री. संतकृपा शिक्षण संस्थेचे, श्री. संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी घोगांव, ता. कराड जि. सातारा या ठिकाणी ०१/०२/ २०२४ रोजी सकाळी – ९:०० वाजता श्री. संतकृपा कबड्डी चॅम्पियनशिप आयोजित केली आहे. ही कबड्डी चॅम्पियनशिप डिप्लोमा रेगुलर विद्यार्थी व ११ वी, १२ वी (सायन्स) मुले व मुली यांच्यासाठी आहे. स्पर्धेचे बक्षीस पुढील प्रमाणे राहील मुले प्रथम पारितोषिक 7777-/ हजार रुपये रोख रक्कम व चषक हे Y MAX POWER SYSTEMS, ICHALKARANJI यांच्याकडून देण्यात येणार आहे. तसेच द्वितीय पारितोषिक 4444/- हजार रुपये रोख रक्कम आणि चषक मुली प्रथम पारितोषिक 4444/- हजार रुपये रोख रक्कम व चषक तसेच द्वितीय पारितोषिक 3333/- हजार रुपये रोख रक्कम व चषक हे प्रियदर्शनी प्लायवूड अँड हार्डवेअर मॉल कराड यांच्याकडून देण्यात येणार आहे. आणि Best Rider साठी ओम फुटवेअर उंडाळे यांच्याकडून शूज गिफ्ट मिळणार आहे. याची खेळाडूंनी नोंद घ्यावी. सहभागी खेळाडूंना नाष्ठ्याची सोय केलेली आहे. तसेच खेळाडूंना कराड पासून बसची सोय (वेळ – सकाळी ८:३० वाजता) केलेली आहे.
गेली आठ दिवस झाले सामन्याची तयारी युद्धपातळीवर, जय्यत सुरू आहे सामन्यांमध्ये फक्त मर्यादित प्रवेश शिल्लक आहेत. प्रवेशासाठी संपर्क – SPORT INCHARGE श्री. दिपक पवार (सर) मो.नं.8855006595 स्पोर्ट्स कमिटी म्हणून श्री. प्रशांत पुजारी सर, श्री. अजित पाटील सर, श्री. देवकर सर, श्री. सुभाष थोरात सर, श्री. नाईक सर, श्री. संदीप पाटील सर, श्री, बोरडे सर श्री. डी. एम. काळे सर, श्री. शुभंम थोरात सर, सौ. माने मॅडम, सौ. मोठे मॅडम, सुवर्णा पाटील मॅडम, सौ. साबळे मॅडम, खुडे मॅडम इ. काम पाहत आहेत. तरी महाविद्यालयाचे प्राचार्य सन्माननीय श्री. डॉ. स्वानंद कुलकर्णी (सर) यांनी अजून जास्तीत जास्त संघ सहभागी व्हावे असे आव्हान केले आहे.