जीवनशैलीशिक्षण

श्री संतकृपा डी फार्मसी महाविद्यालयास NBA मानांकन

श्री संतकृपा डी फार्मसी महाविद्यालयास NBA मानांकन
सातारा जिल्ह्यातील पहिले NBA प्राप्त महाविद्यालय.
कराड : ग्राम दौलत –
घोगाव तालुका कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी ( डी फार्म) महाविद्यालयची नॅशनल बोर्ड ऑफ ऑक्रिडिटेशन नवी दिल्ली यांच्या टीमने नुकतीच भेट दिली. त्यांनी तीन दिवस महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली त्यानंतर त्यांनी केलेल्या मूल्यांकनानुसार महाविद्यालयाला 30 जून 2026 पर्यंत NBA मान्यता प्रदान करण्यात आली.
आत्तापर्यंत सलग तीन वर्षाकरिता प्रथम प्रयत्नात NBA मान्यता मिळवण्याचे श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी(डी. फार्म) हे सातारा जिल्ह्यातील पहिले आणि महाराष्ट्रातील सहावे महाविद्यालय ठरले आहे.
यामुळे ‘श्री संतकृपा डी फार्मसी कॉलेज’ची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनी दिली.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेने घोगाव सारख्या ग्रामीण भागात इंटरनॅशनल स्कूल, ज्युनिअर कॉलेज, इंजिनिअरिंग, डी. फार्मसी, बी. फार्मसी तसेच एम. फार्मसी पर्यंतचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे.
विद्यार्थ्यांना संस्था देत असलेल्या विविध सुविधा लक्षात घेऊन एनबीए ने श्री संतकृपा डी.फार्मसी या महाविद्यालयास मानांकन दिले आहे. एनबीएच्या समितीने महाविद्यालयास भेट देऊन पाहणी केली होती. हे मानांकन तीन वर्षांसाठी देण्यात आले आहे.
संस्थेच्या सर्व विद्यालयांच्या गुणवत्तेचा स्तर उंचावत असून, मानांकनामुळे महाविद्यालयाची जबाबदारी वाढली आहे.
या महाविद्यालयातील अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत येथील विद्यार्थ्यांना आपल्या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यात महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. महाविद्यालयातील तज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, मशीनरूम, संगणककक्ष, क्लासरूम यामुळे विद्यार्थ्यांची पहिली पसंती याच महाविद्यालयातून शिक्षण घ्यावी अशी होते. तसेच कॅन्टीन, बस वाहतूक व्यवस्था, मेडिसिनल गार्डन, सेमिनार हॉल, खेळासाठी सुसज्ज मैदान अशा सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
महाविद्यालयाला एनबीए मान्यता मिळण्यासाठी वर्षभर अथक परिश्रम घेणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व त्यांच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या यशामध्ये मोलाचे योगदान आहे या त्यांच्या परिश्रमाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, उपाध्यक्षा अनुराधा गांधी, सचिव प्रसून जोहरी, खजिनदार प्राजक्ता जोहरी संचालक अशोक जोहरी यांनी प्राचार्या डॉ. वैशाली पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आजी,माझी विद्यार्थी यांचे विशेष अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »