सर्वसामान्यांच्या हितासाठी कृष्णा बँक सदैव कटीबद्ध : डॉ. सुरेश भोसले
आगाशिवनगर शाखेचे उद्घाटन; पहिल्याच दिवशी ६ कोटी ७० लाख रुपयांच्या ठेवी
कराड: ग्राम दौलत
कृष्णा सहकारी बँकेने नेहमीच सर्वसामान्य जनतेचे आर्थिक हित जपले आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. आगाशिवनगर – मलकापूर (ता. कराड) येथे कृष्णा सहकारी बँकेच्या १९ व्या शाखेच्या व एटीएम सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते कृष्णा बँकेच्या नूतन शाखेचे व बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते एटीएम सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सौ. गौरवी भोसले, श्री. विनायक भोसले, बँकेचे व्हाईस चेअरमन दामाजी मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान जाधव, शाखाधिकारी सौ. ज्योती कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ. सुरेश भोसले यांनी सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पांनी सुरू केलेल्या सर्वच सहकारी संस्था चांगल्या चालल्या असून, चांगल्या सहकार्यांमुळेच हे शक्य झाल्याचे सांगितले.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, की खातेदार, ग्राहक व ठेवीदारांच्या विश्वासामुळेच कृष्णा बँकेने बँकिंग क्षेत्रात नावलौकिक कमाविला आहे. शून्य टक्के नेट एनपीए बरोबरच सातत्याने अ वर्ग ऑडिट दर्जा बँकेने प्राप्त केला आहे. बँकेचा लवकरच महाराष्ट्रात विस्तार करण्याचा मनोदय आहे.
भगवान जाधव यांनी स्वागत व प्रास्तविक केले. सौ. ज्योती कदम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला धनलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक दिलीपभाऊ चव्हाण, उद्योजक आर. टी. स्वामी, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रमोद पाटील, रणजीत लाड, हर्षवर्धन मोहिते, नामदेव कदम, प्रदीप थोरात, विजय जगताप, प्रकाश पाटील, गिरीश शहा, शिवाजी पाटील, संतोष पाटील, अनिल बनसोडे, नारायण शिंगाडे, सरिता निकम, सौ. सारिका पवार, ॲड. विजय पाटील, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सचिन तोडकर, सदस्य गुणवंत जाधव, राजेंद्र कुंभार, हेमंत पाटील, प्रमोद पाटील, सुनील पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.