कुसुर विद्यालयातील 69 बालसवंगडी भेटले 32 वर्षांनी
कुसुर विद्यालयातील 69 बालसवंगडी भेटले 32 वर्षांनी….
कराड : ग्राम दौलत
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गाडगे महाराज विद्यालयाच्या एस.एस.सी.बॅच 1991-92 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. माजी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या समवेत झालेल्या मेळाव्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जुन्या स्मृतींना उजाळा देत पुन्हा एकदा विद्यार्थी दशेत गेल्याचा सुखद अनुभव घेतला. तब्बल 69 शालेय बाल सवंगड्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू,ओठावर हसू व मनात अभिमानाची भावना जागृत झाल्याचे दिसत होते.
प्रारंभी वर्गमित्र कै. शहीद संदीप बबन सावंत यांच्या कोळीवाडी येथील स्मृतिस्थळावर पुष्पहार अर्पण अभिवादन केले.
माजी विद्यार्थी आनंदा कोळेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.याप्रसंगी दिवंगत विद्यार्थी व शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. वर्गमित्र व सध्या कुसुरचे प्रथम नागरिक बाळासाहेब कदम यांचा सत्कार करण्यात आला.
आनंदा कोळेकर यांनी प्रास्ताविकामध्ये विद्यालयास माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मदत करण्याचे आश्वासन दिले .
शिक्षक श्री खडे म्हणाले,मनुष्य नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने कितीही दूर गेला तरी त्याला आपले गाव,शाळा,शिक्षक व बालमित्र यांच्याबद्दल कायम ओढ व आपुलकी असते. हे सर्वांचे बोलण्यातून व त्यांच्या डोळ्यातून दिसत होते.माजी विद्यार्थी हे शाळेचे भूषण असतात .विद्यार्थ्यांनी आपल्या क्षेत्रात मिळविलेला लौकिक हा गावाच्या व शाळेच्या नावलौकिकात भर टाकणारा असतो.
कुसुर शाळेत कोळीवाडी ,तारूख,काढणे, बामणवाडी व परिसरातील विद्यार्थी येत होते. पण आजचे वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील विविध भागातून 69 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती.
दुपारी गप्पा गोष्टी, जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्वजण विद्यार्थी दशेत गेल्याचा आभास निर्माण झाला.
कार्यक्रमास शिक्षक ए.एम. मणेर,बी.डी.पाटील,जे.एन. कुंभार,एस.एस.पवार,एस.के.कुंभार, एस.एम.पांढरपट्टे,बी.टी.साठे. विठ्ठल कुंभार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन सतीश भिसे, वर्गमित्रांनी केले. सूत्रसंचलन उमाकांत जंगम यांनी केले.