आरोग्यजीवनशैली

श्री मळाई ग्रुपची रक्तदान चळवळ भव्य दिव्य:संतोष मुंडे

श्री मळाई ग्रुपची रक्तदान चळवळ भव्य दिव्य:संतोष मुंडे
ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
कराड : प्रतिनिधी-
मलकापूर- श्री मळाईग्रुप व विज्ञान प्रबोधिनी कराड यांच्या संयुक्त विद्यमाने सोळावे भव्य रक्तदान शिबीर नुकतेच श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनिअर कॉलेज व आ.च. विद्यालय मलकापूर येथे संपन्न झाले. यावेळी बोलताना दिव्यांग मंत्रालय अभियान महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष मा. संतोष मुंडे यांनी हे मत व्यक्त केले. शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा.संतोष मुंडे यांचे शुभ हस्ते व मळाई ग्रुपचे सर्वेसर्वा शेतीमित्र अशोकराव थोरात व श्री मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ.स्वाती डॉक्टर निलेश जमदाडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी बोलताना मा. संतोष मुंडे म्हणाले, मळाई ग्रुपची रक्तदान चळवळ ही भव्य दिव्य आहे मुळातच रक्तदान शिबिर घेणे ही बाब रक्तात असावी लागते,ती येथील संयोजकामध्ये दिसली. आज ऑनलाइन किंवा इतर अनेक ठिकाणी आपणास लागणारी वस्तू सहज उपलब्ध होते.मात्र रक्तासाठी जिगरबाज रक्तदाता असावा असतो. असे ते म्हणाले. तरुणांशी संवाद साधताना ते म्हणाले ज्याने आपल्यावर विश्वास ठेवला आहे, त्या विश्वासास तडा जाऊ देऊ नका, व्यसनापासून दूर रहा,देशावर प्रेम करा, कामावर आपली निष्ठा असावी असा संदेश दिला.
मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्षा डॉ. स्वाती थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत मळाई ग्रुपने उच्चांकी रक्तदानाचा संकल्प केला होता तो उदार,मानवतावादी, निस्वार्थी वृत्ती असणाऱ्या रक्तदात्यांमुळे पूर्ण झाला असून उच्चांकी प्रतिसाद हेच मळाई ग्रुपचे यश आहे असे मत याप्रसंगी व्यक्त केले. गेली 15 वर्षे आम्ही हा उपक्रम घेत आहोत यामध्ये आम्हाला समाजाने निस्वार्थ भावनेने मदत केली. आज श्री मळाई ग्रुप व समाजाचे रक्ताचे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत. रक्तदानासाठी 387 रक्तदाते स्वयंस्पोर्तने सहभागी झाले त्यापैकी 347 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मळाई ग्रुपचे प्रमुख शेतीमित्र अशोकराव थोरात शिबिराविषयी बोलताना म्हणाले, यापूर्वी रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.यावर्षीही असाच प्रतिसाद या वेळीही मिळाला.श्री मळाई ग्रुपने रक्तदात्यांची आपुलकी जपली हेच यावरून दिसून येते.तरुण रक्तदात्यांना ते म्हणाले आपण भारताचे भावी सुजान नागरिक, शेतकरी, शिक्षक,डॉक्टर,व्यावसायिक या व अशा अनेक क्षेत्रात चमकणार आहात तुमचे अनुकरण इतरांनी करावे असा आदर्श समाजासमोर ठेवावा असा त्यांनी केला.
या भव्यदिव्य शिबिरास महाराष्ट्र राज्य प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. उदयसिंह पाटील जगन्नाथ मोरे, स्वाती पिसाळ, विद्या मोरे,प्रवीण केंजळे,रामचंद्र जगताप, अमर इंगवले, मलकापूर नगरपालिकेच्या नगरसेविका निर्मला काशीद, मा.निलेश जमदाडे, सलीम मुजावर, मलकापूर नगरपालिका विरोधीपक्ष नेते अजित थोरात,
रोटरी सचिव विनोद आमले , रोटरी अध्यक्ष विलास पवार,रो.भगवान मुळीक, चंद्रशेखर दोडमणी, गजेंद्र पाटील, जायंंटस ग्रुप कासेगावचे गिरीश ओसवाल ,राकेश सुधाकर शिंदे हनीफ मुल्ला, डॉ. राजेश थोरात,बी.बी.पाटील, पी. जी. पाटील, वसंतराव संजय तडाखे यांंनी सदिच्छा भेट दिली व उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
रक्तदान शिबिरासाठी महालक्ष्मी ब्लड बँकेच्या मा. विना ढापरे व यशवंत ब्लड बँकेचे डॉ. संदीप यादव तसेच महेश सावंत, महेश कांबळे,वैभव शिर्के,दत्तात्रय शिर्के,आर.व्ही.थोरात, सिताराम कोळेकर,शिल्पा तीरमारे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान प्रबोधिनी कराडचे सर्व सदस्य, श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी व शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक सर्व कर्मचारी,एन.सी.सी व एम सी. सी. विद्यार्थी ,विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ सुरेखा खंडागळे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार सौ शीला पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »