
रक्तदान ही जनसामान्यांची सेवा यालाच मानूया ईश्वरसेवा:शेती मित्र अशोकराव थोरात
ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
कराड –
शुक्रवार दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 3.30 या वेळेत श्री मळाई ग्रुप,मळाई देवी नागरी सह.पतसंस्था, मळाई देवी शिक्षण संस्था व विज्ञान प्रबोधिनी कराड यांचे संयुक्त विद्यमाने आदर्श जुनियर कॉलेज मलकापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.
कृत्रिम पद्धतीने रक्त तयार करता येत नसून आज अनेक महाभयंकर आजार ॲनिमिया,हिमोफेलिया, थ्रोम्बोसायटोफेनिया,डेंग्यू,थॅली सेमिया,यकृताचे आजार,किडनीचे आजार,ब्लड कॅन्सर,आयटीपी अपघातग्रस्त व विविध शस्त्रक्रियां मध्ये रक्ताची गरज व तुटवडा ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.
श्री मळाई ग्रुप गेली 15 वर्षे अत्यंत भव्य स्वरूपात सामाजिक जाणिवेतून समाजात जनजागृती करून रक्तदान शिबिराचे आयोजन करत असतो. मळाई ग्रुपतर्फे गेल्या दहा वर्षात 2715 विक्रमी रक्तदात्यांनी रक्तदान केले असून या रक्ताचा उपयोग अनेेक गोरगरीब,गरजूंनी पूर्णपणे मोफत लाभ घेतलेला आहे.
रक्तदात्यांना सर्व रक्ताच्या व वैद्यकीय तपासण्या मोफत करून दिल्या जातात तसेच त्यांच्या नातेवाईकांस गरजेनुसार तात्काळ व मोफत रक्ताचा पुरवठा केला जातो.*ही सेवा कराड,सातारा,सांगली, इचलकरंजी,पुणे,मुंबई येथील रक्तदात्यांच्या नातेवाईक रुग्णांना दिली जाते*. रक्तदानाचे महत्त्व ओळखून या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा तसेच रोटरी क्लब, लायन्स क्लब,इनरव्हील क्लब,सर्व व्यायामशाळा,एनसीसी,शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी रक्तदाते पाठवून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहन मळाई ग्रुप तर्फे संयोजिका डॉक्टर स्वाती थोरात यांनी केले.