स्वा.सावरकरांचा अपमान करणाऱ्या खर्गेंविरोधात भाजपाची जोरदार निदर्शने
स्वा.सावरकरांचा अपमान करणाऱ्या खर्गेंविरोधात भाजपाची जोरदार निदर्शने
कराड: ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र, कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात अपमानजनक वक्तव्य केले आहे. याबद्दल खर्गे यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या कराड दक्षिण शाखेच्यावतीने मलकापूर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.
कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान काय? आणि त्यांचा पराक्रम काय? असा प्रश्न उपस्थित करुन देशातील संपूर्ण देशभक्तांचा अपमान केला आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. आधी राहुल गांधी आणि आता खर्गे सावरकरांवर टीका करताहेत. पण या देशातील जनता स्वातंत्र्यवीरांचा अवमान कधीच सहन करणार नाही. या अवमानाबद्दल मतदारही काँग्रेसला धडा शिकवतील, असा इशारा यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील यांनी दिला. यावेळी खर्गे आणि काँग्रेसच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी कापीलचे माजी सरपंच मोहनराव जाधव, पंकज पाटील, धनाजी माने, नंदकुमार जाधव, बाळासो पवार, प्रदीप जाधव, संजय पाटील, अरुण जाधव, संजय सावंत, जयकर मोरे, विक्रम जाधव, शिवराज जाधव, महादेव कुंभार, शिवराज जाधव, संभाजी ढापरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.