प्रकाश वायदंडे यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान
प्रकाश वायदंडे यांना आदिवासी सेवक पुरस्कार प्रदान
नाशिक:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
पारधी मुक्ती आंदोलनाचे अध्यक्ष, दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष, सत्यशोधक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक प्रकाश वायदंडे यांना त्यांनी गेल्या २० वर्षात आदिवासी पारधी जमातीचे पुनर्वसन आणि उत्थानासाठी अविरत केलेल्या कामाची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांना आदिवासी विकास विभागाच्या वतीने देण्यात येणारे *आदिवासी सेवक* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिर येथे राज्याचे आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते व आदिवासी आयुक्त श्रीमती नयना गुंडे,सह आयुक्त माळी, प्रकल्प अधिकारी घोडेगाव बळवंत गायकवाड, विकास निरीक्षक बसवराज गुजगोंड, प्रमोद पिंपळे यांच्यासह आदिवासी विकास विभागातील अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीतीमध्ये प्रकाश वायदंडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.आ.ह.साळुंखे,माजी मंत्री आ.बाळासाहेब पाटील,प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे,प्रा.डॉ.शरद गायकवाड, तलाठी पटवारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल,उद्योजक पोपटराव वायदंडे , विजय यादव, पवन निकम , युवानेते वैभव भैया थोरात,पारधी मुक्ती आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांच्यासह समाजातील विविध स्तरावरुन प्रकाश वायदंडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.