जीवनशैलीव्यवसाय

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाने कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली : प्राचार्य एस आर पाटील

स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शनाने कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली : प्राचार्य एस आर पाटील
कराड : प्रतिनिधी-
18 वे यशवंतराव चव्हाण कृषि औद्योगिक व पशू पक्षी प्रदर्शनास लाखात शेतकरी भेटी देतात ही बाब येथील कृषी क्षेत्राला नवी दिशा देणारी असल्याचे प्रतिपादन कराड कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस आर पाटील यांनी केले.
कराड शेती
उत्पन्न बाजार समितीचे वतीने आयोजित18 वे स्व यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशपक्षी प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील,रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अँड उदयसिंह पाटील-उंडाळकर,विभागीय कृषी संचालक बसवराज बिराजदार,सातारा जि प चे कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी यावर्षीचे स्व यशवंतराव चव्हाण शेतीनिष्ठ पुरस्कार देऊन चारुदत्त पाटील,रेठरे खुर्द,मच्छिंद्र फडदरे बेलवाडी, संजय शेटे काले, बाबुराव चव्हाण कोपर्डे हवेली,तुकाराम डुबल म्होप्रे यासह दहा शेतकऱ्यांना गौरविण्यात आले.
प्राचार्य एस आर पाटील बोलताना म्हणाले,या प्रदर्शाची संकल्पनाच लोकनेते स्व. विलासकाका पाटील -उंडाळकर, यांची कृषी क्षेत्रातील नवनवे प्रयोग त्याची माहिती आपल्या शेतकऱ्यांना मिळावी व त्यातून शेती व शेतकरी प्रगत व्हावा हा यामागचा काकांचा विचार होता प्रदर्शनाची व्याप्ती पाहता आज तो विचार यशस्वी झालेला आहे.आज शेती परवडत नाही ही हे खरे असून यासाठी शेतकऱ्यांनी कृषि खाते,महाविद्यालय,संशोधन संस्था यांचे मार्गदर्शन घेऊन वाटचाल करणे आवश्यक आहे.
उदयसिंह पाटील म्हणाले,18 वर्षांपूर्वी स्व. काकांनी कृषी प्रदर्शनची मुहूर्तमेढ रोवली आज हे प्रदर्शन राष्ट्रीय पातळीवर जाऊन पोचले आहे.आज 10 लाखाहून अधिक शेतकरी भेटी देऊन माहिती घेतात हे प्रदर्शनाचे फलित आहे.प्रदर्शनच्या यशासाठी बाजार समिती बरोबर महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग,शासनाचे इतर सर्व विभाग यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे.
नितीन भरगुडे पाटील म्हणाले,कराड च्या कृषी प्रदर्शनच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांचा विचार तेवत ठेवण्याचे काम बाजार समितीच्या माध्यमातून सुरू आहे सातारा जिल्हा चव्हाणसाहेब व काकांचे उपकार कधी ही विसरू शकत नाही.त्याच्यामुळेच सर्वसामान्य माणूस सत्तेत गेला म्हणून आम्ही येथे उभे आहोत. बसवराज बिराजदार यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी केले. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी तर आभार संचालक प्रकाश पाटील यांनी मानले.कार्यक्रमास कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिलराव मोहिते,उपविभागीय कृषी अधिकारी आर एम मुल्ला,तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात,हणमंतराव चव्हाण,धनाजीराव काटकर,रमेश देशमुख पुरस्कार प्राप्त शेतकरी,विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »