प्रदेश चिटणीसपदी कविता कचरे, भाजप महिला मोर्चाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी
प्रदेश चिटणीसपदी कविता कचरे
भाजप महिला मोर्चाच्या संघटनात्मक कामाची जबाबदारी
ढेबेवाडी:ग्राम दौलत न्युज नेटवर्क-
भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी कविता सतीश कचरे यांची निवड झाली आहे. मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नुकतेच त्यांना नियुक्तिपत्र दिले आहे.
कविता कचरे या १७ वर्षांपासून भारतीय जनता पक्षात सक्रिय असून, यापूर्वी त्यांनी महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, प्रदेश कार्यकारिणी सदस्या, जिल्हाध्यक्षा, सातारा जिल्हा कोअर समिती सदस्या, भारतीय खाद्य निगमच्या गोवा राज्याच्या सदस्या, तालुका पुनर्विलोकन समन्वयक समिती तसेच तालुका दक्षता समिती सदस्या आणि कोल्हापूर ग्रामीणच्या समन्वयक आदी पदांवर यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली आहे.
तळमावले विभागात त्यांनी महिलांचे मजबूत संघटन करून त्याद्वारे बचत गटांचे सक्षमीकरणही केले आहे. महिलांच्या रोजगार निर्मितीत त्या योगदान देत आहेत.तळमावले येथे त्यांनी उभारलेला दारूबंदीचा लढा विशेष गाजला. पक्षाचे विविध उपक्रम आणि कार्यक्रम तळागाळापर्यंत पोचविण्यात त्यांनी योगदान दिले आहे. भारतीय जनता पक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित असलेले पक्षाचे संघटनात्मक कार्य अधिक सक्षमपणे करण्यासाठी प्रदेश महिला मोर्चाच्या माध्यमातून आपण कार्यरत राहावे, असे पत्रात नमूद केले आहे. निवडीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.