जीवनशैली

कृष्णा कालव्यासाठी ६० लाख मंजूर खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यास मिळाले यश

कृष्णा कालव्यासाठी ६० लाख मंजूर खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यास मिळाले यश
कराड : ग्राम दौलत न्युज नेटवर्क –
खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुचवलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील कृष्णा कालव्यातंर्गत ६० लाख खर्चाच्या विविध कामांना मंजुरी प्राप्त झाली आहे. त्यामुळे कृष्णा कालव्यावरील अनेक गावच्या हद्दीतील विविध कामांना गती मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या कृष्णा कालव्याचे मागील काही वर्षांत नुकसान झाले आहे. कालव्यावरील बांधकामाचे नुकसान झाल्यामुळे सदरची कामे पूर्ण होणे आवश्यक होते. याविषयी कराड व शेणोली परिसरातील नागरिक व शेतकऱ्यांनी कामे होण्यासंदर्भात खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार खासदार श्रीनिवास पाटील यांनी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून तशी मागणी केली होती. खासदार श्रीनिवास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाने गोटे, गोवारे, सैदापूर, कोडोली, रेठरे, कार्वे, कोडोली, गोंदी आदी गावांच्या हद्दीतील कामासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये बिगर सिंचन प्रापणसूची अंतर्गत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची मंजुरी प्राप्त झालेली आहे. यामध्ये कृष्णा कालवा गोवारे हद्दीतील बॉक्स कल्व्हर्टचे पुन्हा बांधकाम करणे, गोटे हद्दीतील स्मशान भूमीकरिता कृष्णा नदीवर घाट बांधणे, कोडोली पोटपाट (वाखाण रोड)ठिकाणचे काँक्रिट अस्तरीकरण करणे, गोवारे हद्दीतील गावपूल दुरुस्ती करणे, सैदापूर हद्दीतील सीडी वर्क बांधकाम करणे, रेठरे येथील वितरिकांचे अस्तरीकरण करणे, कार्वे कोडोली व दुशेरे लघु वितरिका अस्तरीकरण करणे, गोंदी हद्दीतील सीडी वर्क बांधकाम करणे आदी कामांचा समावेश आहे.
या सर्व कामांसाठी ६० लाखांच्या अंदाजित रकमेची तरतूद करण्यात आली आहे. सदरच्या मंजूर कामांची निविदा पूर्ण करुन काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याची माहिती टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडीचे कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीपार यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांना पत्राद्वारे कळवली असल्यानेही ही कामे लवकरच सुरू होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »