राज्यव्यवसाय

२४ ते २८ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन भरविले जाणार : सभापती विजयकुमार कदम

२४ ते २८ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन भरविले जाणार : सभापती विजयकुमार कदम
कराड : प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्याच्या कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षीही कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दिनांक २४ ते २८ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान १८ वे राज्यस्तरीय स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शन भरविले जाणार असलेचे माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी दिली.
कराड येथे गेली १८ वर्षे लोकनेते स्व. विलासराव पाटील-उंडाळकरांचे संकल्पनेतून कृषी प्रदर्शन भरविले जाते यावर्षी ही मागील परंपरा जोपासत शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने प्रदर्शन भरविणेची प्रक्रीया सुरु केली आहे हे प्रदर्शन स्वा. से. शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटच्या आवारात भरत आहे.
प्रदर्शनात ४०० पेक्षा अधिक विविध प्रकारचे स्टॉल सहभागी होणार असून यातील १०० स्टॉल शेतक-यांच्या कृषी माल विक्रीसाठी मोफत पुरविले जाणार आहेत. प्रदर्शनात ऊस, केळी, भाजीपाला पिक स्पर्धा व प्रदर्शन विविध फळे, फुले स्पर्धा व प्रदर्शन तसेच पशु-पक्षी स्पर्धा व प्रदर्शन भरविले जाणार आहे.
प्रदर्शनाचे उदघाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथराव शिंदे. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारचे पालकमंत्री मा. ना. शंभुराज देसाई, राज्याचे कृषी मंत्री मा. ना. धनंजय मुंडे, पणन मंत्री मा. ना. अब्दुल सत्तार, महसूल व पशुसंवर्धन मंत्री मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील, सहकार मंत्री मा. ना. दिलीप वळसे-पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) खासदार मा. श्रीनिवास पाटील, रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर व सातारा जिल्हातील विविध खात्यांचे अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
मंगळवार दि. १४ रोजी कृषी प्रदर्शाच्या मंडपाचे भूमिपूजन
स्व. यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशु-पक्षी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, मा. धैर्यशील कदम मा. मनोज घोरपडे, यांचे शुभहस्ते मंगळवार दि. १४ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रदर्शनस्थळी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »