पोतले येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पंतप्रधानांना रक्ताच्या ठशांचे पत्र
पोतले येथील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने पंतप्रधानांना रक्ताच्या ठशांचे पत्र
कराड:प्रतिनिधी –
मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय पोतले (ता.कराड) येथील सकल मराठा समाज बांधवांनी घेतला. या वेळी २०० जणांनी अंगठ्याच्या रक्ताचे ठसे निवेदनावर उठवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ते निवेदन पाठवले जाणार आहे. आंदोलनाला पाठिंबा दर्शविताना पुढील दिशा ठरवण्यात आली.
पोतलेच्या मराठा समाजाची बैठक सोमवारी सायंकाळी झाली. तेथील ग्रामदैवत विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात झालेल्या बैठकीत जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन दिले. या वेळी अशोकराव पाटील-पोतलेकर, सरपंच अविनाश गुरव, अंकुश नांगरे- पाटील, ऋषिकेश पाटील, भगवान पाटील, सदाशिव पवार, बजरंग नांगरे, अधिकराव पाटील, महादेव पाटील, संदीप पाटील, संजय देसाई, विकास पाटील, अतुल पाटील, सागर पाटील, अनिल माळी, लतीफ मुल्ला, अशोक तपासे, बाळासाहेब राऊत, उमेश पाटील, संपत पाटील, सुनील पाटील, माजी सरपंच रामचंद्र पाटील यासह महिला उपस्थित होत्या. या वेळी घारेवाडी ते पोतलेदरम्यान अडीच किलोमीटर रॅली काढली.