जीवनशैली
अंतवडी येथे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गाव बंदीचा निर्णय
अंतवडी येथे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गाव बंदीचा निर्णय
कराड: प्रतिनिधी –
मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना गावबंदीचा निर्णय अंतवडी (ता. कराड) येथील सकल मराठा समाज बांधवांनी घेतला. यावेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला.
अंतवडी च्या मराठा समाजाची बैठक गुरुवारी वारी सायंकाळी झाली. तेथील ग्रामदैवत मंदिरात झालेल्या बैठकीत जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन दिले.
यावेळी गावातील सकल मराठा समाजातील बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.