जयवंत शुगर्सकडून गेल्या हंगामाच्या ऊसबिलापोटी एकूण ३००१ रुपये
५० रुपयांचे अंतिम ऊसबिल जाहीर; १३ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ
कराड : प्रतिनिधी –
धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स साखर कारखान्यास सन २०२२-२३ मध्ये गळीतास आलेल्या ऊसास प्रतिटन ५० रुपयांप्रमाणे अंतिम ऊसबिल देण्याचा निर्णय जयवंत शुगर्सचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांनी जाहीर केला आहे. येत्या २७ ऑक्टोबरला ही रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असून, यामुळे जयवंत शुगर्सच्या ऊस उत्पादकांना गेल्या हंगामाच्या ऊसबिलापोटी मिळणारी एकूण रक्कम ३००१ रुपये इतकी होणार आहे.
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर जयवंत शुगर्सच्या १३ व्या गळीत हंगामाला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. ‘जयवंत शुगर्स’चे संस्थापक तथा य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून गळीत हंगामाचा प्रारंभ करण्यात आला.
याप्रसंगी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, श्री. विनायक भोसले, जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
जयवंत शुगर्सची गेल्या गळीत हंगामाची एफआरपी प्रतिटन २९४० रुपये होती. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून, एफआरपीपेक्षा जादा रक्कम म्हणजेच प्रतिटन २९५१ रुपयांचे पहिले ऊसबिल अदा केले होते. कारखान्याची गेल्या गळीत हंगामाची सांगता २२ मार्च रोजी झाली. हंगामाची सांगता झाल्यानंतर अवघ्या ५ दिवसांतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याकडून एफआरपीची सर्व रक्कम अदा करण्यात आली होती. आता प्रतिटन ५० रुपयांचे अंतिम ऊसबिल देण्याचा निर्णय डॉ. भोसले यांनी जाहीर केला असून, येत्या २७ ऑक्टोबरला ही रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या गळीत हंगामातील उसबिलाची एकूण रक्कम ३००१ रुपये इतकी होणार आहे.
प्रारंभी जयवंत शुगर्सचे चेअरमन चंद्रकांत देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चंद्रशिला देसाई यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते वजनकाटा व गव्हाणपूजन करण्यात आले. यावेळी ‘जयवंत शुगर्स’चे डेप्युटी जनरल मॅनेजर (टेक्निकल) आर. आर. इजाते, चिफ इंजिनिअर एच. एम. नदाफ, चिफ केमिस्ट बी. जी. चव्हाणके, सिव्हिल इंजिनिअर एस. एच. शेख, जनरल मॅनेजर (फायनान्स) व्ही. आर. सावरीकर, पर्चेस मॅनेजर वैभव थोरात, केन मॅनेजर नाथाजी कदम, मुख्य शेतकी अधिकारी आर. जे. पाटील, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, इ.डी.पी. मॅनेजर ए. एल. काशीद, एच. आर. मॅनेजर एस. एच. भुसनर, पर्चेस ऑफिसर पी. एस. जाधव, मटेरियल मॅनेजर जी. एस. बाशिंगे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर ए. बी. खटके, इरिगेशन इंजिनिअर आर. एस. नलवडे, सेफ्टी ऑफिसर एस. व्ही. शिद, केनयार्ड सुपरवायझर ए. एम. गोरे, एस. एम. सोमदे यांच्यासह परिसरातील गावांमधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.