श्री.मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थाचा सर्वाधिक 10% लाभांश
श्री.मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थाचा सर्वाधिक 10% लाभांश
माननीय. संस्थापक अध्यक्ष अशोकराव थोरात (भाऊ) शेती मित्र
कराड:प्रतिनिधी –
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेने सन 2022 – 2023 या सालासाठी 10% दराने लाभांश देण्याचे यापूर्वीच जाहीर केलेले आहे सदर लाभांश वाटपाचा शुभारंभ संस्थेचे चेअरमन मा .श्री अजित जोतीराम थोरात यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला.
श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेला 36 वर्षे पूर्ण झाली आहेत व गेल्या 35 वर्षात दरवर्षी सातत्याने सभासदांना लाभांश देणारी श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्था जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळअधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साह्याने संस्थेचे कामकाज उत्तम प्रकारे चालविले असून शेतकरी ,कष्टकरी, कामगार यांच्या विकास करण्याचे ध्येय ठेवले आहे संस्थेने दरवर्षी 10 टक्के लाभांश दिलेला आहे
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह एकूण 20 शाखाकार्यरत असूनएकूण ७२ सेवक आहेत संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत असून यावर्षी दिनांक03/03/2023पासून कोअर बँकिंग प्रणाली लागू केली असून सभासदांना ऑनलाइन सेवा उपलब्ध केलेली आहे संस्थेच्या एकूण शाखा पैकी 17 शाखा स्वमालकीच्या इमारतीत आहेत यावर्षी सेवकांना 10 टक्के पगार वाढ देऊन 15 टक्के प्रमाणे बोनस देण्यात येणार आहे.
कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षण देऊन सभासद व ग्राहकांना तत्पर व विनम्र सेवा दिली जात आहे. श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेचा एकूण व्यवसाय 242 कोटी असून ठेवी 140 कोटी व कर्जे 102 कोटी वाटप करून अधिक आर्थिक स्थिती मजबूत केली आहे संस्थेचे लेखापरीक्षक मे के एल सावंत यांच्याकडून लेखापरीक्षण व
वेळच्यावेळी करून घेऊन वरचेवर त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते.उपनिबंधक सहकारी संस्था कराडचे माननीय श्री संदीप जाधव व त्यांचे सर्व अधिकारी यांचे सातत्याने मार्गदर्शन घेण्यात येते. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले की सहकार खात्याचे सर्व निकष मानांकनांची पूर्तता प्रत्येक वर्षी संस्था करतेच यावर्षी सुद्धा नवीन गुणतक्त्यातील निकषांची पूर्तता संस्थेने पूर्ण केलेली आहे याचे श्रेय संस्थेचे संचालक मंडळ सभासद ठेवीदार कर्जदार तसेच सेवकांना जाते या सहकार्याबद्दल माननीय अशोकराव थोरात यांनी यांचे आभार मानले संस्थेने 52 कोटी 95 लाख रुपयाची सुरक्षित गुंतवणूक केली आहे संस्थेचे वसूल भाग भांडवल 10 कोटी 62 लाख व खेळते भाग भांडवल 169 कोटी रुपये इतके आहे संचालक मंडळाने व्यवसाय व्यवस्थापनाचे वेळ प्रसंगी सहकार खात्याच्या बदल या धोरणानुसार लवचिकता ठेवून धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सभासदांना दिवाळीनिमित्त लाभांश वाटपाचा शुभारंभ दिनांक 21.10. 2023 रोजी करण्यात आला. लाभांश सभासदांच्या सेव्हीग खात्यावरती जमा करण्यात आला आहे असे संस्थेचे चेअरमन माननीय अजित ज्योतीराम थोरात यांनी जाहीर केले या कार्यक्रमावेळी व्हा.चेअरमन श्री चंद्रकांत सखाराम टंगसाळे ,माजी चेअरमन अरूनादेवी पाटील, माजी व्हाईस चेअरमन सुहास जाधव, पांडुरंग पाटील, शामराव पवार भीमाशंकर माउर अरुण पवार व सर्व संचालक सल्लागार सेवक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे सल्लागार वसंत चव्हाण यांनी आभार मानले.