व्यवसाय

जनकल्याण पतसंस्थेच्या चाकण शाखेचा शुभारंभ उत्साहात

जनकल्याण पतसंस्थेच्या चाकण शाखेचा शुभारंभ उत्साहात
कराड:प्रतिनिधी –
कराड येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थ ेच्या १७ व्या चाकण शाखेचा शुभारंभ श्रीकृष्ण वाडेकर, अपर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राजा, पुणे यांच्या शुभहस्ते दिनांक २१.१०.२०२३ रोजी करण्यात आला. यावेळी जेसन ऑटो पार्टचे अजय जोशी, श्री. प्रदीप बर्गे, उपनिबंधक (कृषी व पत) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे, खेडचे सहायक निबंधक श्री. हरिशचंद्र कांबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष श्री. कालीदास वाडेकर, शिवस ेना जिल्हाध्यक्ष भगवानशेठ पोखरकर, आखिल भारतीय वारकरी संघाचे पुणे जिल्हा मार्गदर्शक ह.भ.प.मुक्ताजी नाणेकर, राजनभाई परदेशी माजी जिल्हा उपाध्यक्ष भाजप, महिंद्रा अॅन्ड महिंद्राचे कंपनीचे श्री. अभय लोमटे, बाळासाहेब मांजरे उद्योजक तसेच अनेक मान्यवरांनी शाखेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर देशपांडे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. चाकण शहरात संस्थेची शाखा नक्कीच नावलौकीक मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्री. श्रीकृष्ण वाडेकर, अपर निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जनकल्याणने सामाजीक बांधीलकी जपताना दोन पतसंस्थांचे यशस्ग्री विलीनीकरण करून आदर्श निर्माण केला, राज्यातील अन्स पतसंस्थांनी जनकल्याण पतसंस्थेप्रमाणे आदर्शवत कामकाज करावे असे नमूद केले. यानंतर श्री. प्रदीप बर्गे, उपनिबंधक (कृषी व पत) सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे, खेडचे सहायक निबंधक श्री. हरिशचंद्र कांबळे, जेसन ऑटो पार्टचे अजय जोशी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मिलिंद पेंढारकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक श्री. जितेंद्र शहा, श्री. प्रविण देशपांडे, श्री. दिपक जोशी, श्री. अभिजीत चाफेकर, श्री. सुनिल कुलकर्णी, अशोक आटकर हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »