“पर्यावरणाच्या “अनुषंगाने चित्रकला स्पर्धा संपन्न
कराड: प्रतिनिधी –
ज्येष्ठ नागरिक संघ ,छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल, कराड. या ठिकाणी आज जी चित्रकला स्पर्धा पार पडली ती “राज मेडिकल”चे संस्थापक सलीम भाई मुजावर यांनी स्पॉन्सर केलेली होती. सौ विद्या मोरे यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले. त्यानुसार छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली सदर स्पर्धेमध्ये “पर्यावरणा”च्या अनुषंगाने चित्रे काढण्यात आली .त्यांचे परीक्षण सौ विद्या मोरे व त्यांच्या सहकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .सदर स्पर्धेचा उद्देश जेष्ठ नागरिकांचे मनोरंजन, आनंद ,एकमेकांना एकत्र येणे, हा एकमेव उद्देश असून या आनंदाचा उत्सव सर्वांनी साजरा केला. सदर स्पर्धेमध्ये 21 ज्येष्ठ नागरिक सहभागी झालेले होते व त्यांनी मुक्त हस्ते “पर्यावरणाच्या “अनुषंगाने चित्रे काढली. सदर स्पर्धेमध्ये अनुक्रमाने तीन क्रमांक काढले जातील व त्याचे वितरण 31 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलामध्ये जाहीर करण्यात येईल असे आयोजकांच्यामार्फत सांगण्यात आले. सर्व ज्येष्ठ नागरिकांनी चित्रकला स्पर्धा आयोजित केल्याबद्दल सलीम भाई मुजावर यांचे आभार मानले. यापुढेही अशा स्पर्धांना ज्येष्ठ नागरिक साथ देतील असे जाहीर करण्यात आले. परीक्षक म्हणून सौ निमिषा गोर व सौ प्राजक्ता पालकर लाभले .सदर स्पर्धेसाठी जेष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष, प्रा.डॉ. माने आणि सौ. विद्या मोरे यांनी परिश्रम घेतले.