कराड तालुका वृत्तपत्र विक्रेत्यांचा मेळावा व पाल्यांचा सत्कार सोहळा संपन्न
कराड:प्रतिनिधी –
कराड तालुका वृत्तपत्र विक्रेता व लायन्स क्लब ऑफ कराड यांच्या संयुक्त विद्यमानाने कराड तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात कराड तालुका विक्रेता संघटनेच्या मेळाव्याने झाली सदर मेळाव्यास सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील राज्य वृत्तपत्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर मेळाव्याचे अध्यक्षपदी मा. सचिन सूर्यवंशी (सचिव महाराष्ट्र राज्य संघटना) होते. माननीय सचिन सूर्यवंशी यांना मेळाव्याचे अध्यक्षपद देण्याचा देण्याचा ठराव गिरीश वैद्य कराड यांनी मांडला तर त्याला माननीय रघुनाथ कांबळे (उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटना) यांनी अनुमोदन दिले सदर मेळाव्यास राजेंद्र माळी (अध्यक्ष सातारा जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघटना) मा. सचिन चोपडे ,मारुती नवलाई (कार्यकारणी सदस्य राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना) उपस्थित होते. मेळाव्यात कल्याणकारी महामंडळ होणे गरजेचे का आहे या विषयावर मा. रघुनाथ कांबळे यांनी भूमिका स्पष्ट केली मा. सचिन सूर्यवंशी यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या व्यवसायातील अडचणी व इथून पुढे विक्रेत्यांना सातारा ,सांगली ,सोलापूर ,कोल्हापूर या शेजारील जिल्ह्य़ाप्रमाणेच विक्रेतांना कमिशन मिळावे ही मागणी केली आणि त्यासाठी वृत्तपत्र मालकांकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मा. मारुती नवलाई ,सचिन चोपडे ,राजेंद्र माळी, यांनी विक्रेत्यांना मार्गदर्शन केले सदर मेळाव्यास लहूराज लवळे ,सुनील शिंदे ,किरण वनगुते ,सुरेश ब्रह्मपुरे ,अंकुश परब ,देवानंद वसगडे त्याचप्रमाणे कराड शहर व तालुक्यातील वृत्तपत्र विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर विक्रेता मेळाव्यानंतर विक्रेत्यांच्या पाल्यांचा सत्कार लायन्स क्लब ऑफ कराडचे पदाधिकरी ला. अँड. विराग जांभळे (अध्यक्ष) ला.सतीश मोरे (सचिव) ला. जितेंद्र ओसवाल( खजिनदार) ला. अँड. सतीश पाटील ला.राजेश शहा यांच्या हस्ते करण्यात आला या सोहळ्यास जवळपास 60 पाल्यांची उपस्थिती होती.
सदर सोहळ्यात सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीने अजिंक्य करपे उपस्थित होते.
पाल्यांच्या सत्कारासाठी लायन्स क्लब ऑफ कराड दैनिक सकाळ वृत्तपत्र समूह मा.सलीम मुजावर (असिस्टंट गव्हर्नर रोटरी क्लब ऑफ मलकापूर) माननीय संदीप चेणगे दैनिक मुक्तागिरी यांनीही मदत केली.
संघटनेच्या वतीने त्यांचे आभार गिरीश वैद्य यांनी मानले.
अक्षय पात्र मल्टीपर्पज हॉलचे मालक श्री केदार डोईफोडे यांनी हॉल मोफत उपलब्ध करून दिला.
मेळावा व सत्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी गौतम काटरे ,महादेव गिरी गोसावी, धर्मेंद्र पाटील ,जावेद काझी ,संजय माळी ,अनिल पालेकर ,विलास माळी, धनंजय पोतदार व कराड वृत्तपत्र विक्रेता कार्यकारणी मंडळ व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.