दिव्यांगासाठी 24 तास उपलब्ध : मनोज माळी
विविध सामाजिक उपक्रमांनी मनोज माळी यांचा वाढदिवस साजरा
कराड : प्रतिनिधी –
प्रहारच्या माध्यमातून आमदार बच्चूभाऊ कडू समाजातील गोरगरीब दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. त्यांचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून कराड तालुका व जिल्ह्य़ातील दिव्यांगासाठी मी 24 तास उपलब्ध आहे. कुठलेही सामाजीक, वैयक्तिक अथवा शासकीय कार्यालयातील कामासाठी दिव्यांगाना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन मनोज माळी यांनी दिले.
प्रहारचे सामाजिक कार्यकर्ते मनोज माळी यांचा वाढदिवस शनिवारी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने करवडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला. उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. तसेच कराडच्या बालसुधारगृहातील मुलांना साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
वाढदिवसाच्या निमित्ताने ओगलेवाडी येथील राम मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात गोरगरीब, गरजू दिव्यांगाना अन्न – धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी आप्पाभाऊ पिसाळ, अजितराव बानगुडे, नरेंद्र लिबे, अधिक सुर्वे, शिवाजी चव्हाण, संदिप पाटील, निषांत ढेकळे, अशोक पवार, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मनोज माळी म्हणाले की, आमदार बच्चूभाऊ कडू यांचे प्रयत्न व पाठपुराव्यामुळे शासनाने दिव्यांगासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मात्र आजही खेड्या-पाड्यातील अनेक दिव्यांग शासकीय योजनाच्या लाभापासून वंचित रहात आहेत. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणारी प्रत्येक योजना जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्या पर्यंत पोहचली पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मनोज माळी यांनी सांगितले.
यावेळी, उपसरपंच राहूल भोसले, विक्रम पिसाळ, वैभव चव्हाण, भानुदास डाईंगडे, बंटी मोरे, दादा कावरे, वैभव पिसाळ, दत्तात्रय पिसाळ, स्वप्नील पिसाळ, राहूल पाटील, किशोर पिसाळ, साहेबराव मोरे, जयदीप अचार्य, विशाल दबडे, सुहास आरकर, आशू जाधव, प्रवीण नांगरे, सचिन कुंभार, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.