दिल्ली एनसीआरराज्यश्रद्धा
हुतात्मा जवान शंकर उकलीकर यांच्या पार्थिवास कराडात मान्यवरांकडून अभिवादन
हुतात्मा जवान शंकर उकलीकर यांच्या पार्थिवास कराडात मान्यवरांकडून अभिवादन
कराड : प्रविण शिंदे –
अमर रहे अमर रहे…. शहीद जवान अमर रहे…, वीर जवान तुझे सलाम …..भारत
माता की जय….. वंदे मातरम या ना अशा घोषणा देत कारगीलच्या लेह येथील बर्फाळ प्रदेशातील एका दुर्घटनेत भारतीय सैन्य दलातील इंजिनीयर रेजीमेंटमध्ये कार्यरत असलेले वसंतगडचे (ता.कराड)नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर( वय ३८) या भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो आबाल वृद्धबाल कराडला जमले होते.
कराडच्या विजय दिवस चौकात त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी वसंतगडला त्यांची अंत्ययात्रा काढून नेण्यात आले.