शहीद जवान शंकर उकलीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वसंतगड येथे अंत्यसंस्काऱ
शहीद जवान शंकर उकलीकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात वसंतगड येथे अंत्यसंस्काऱ
सातारा : प्रतिनिधी –
शहीद जवान नायब सुभेदार शंकर बसाप्पा उकलीकर यांच्या पार्थिवावर आज वसंतगड, ता. कराड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भाऊसाहेब काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य उदय पाटील यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकारी व आजी माजी सैनिकांनी शहीद जवान शंकर उकलीकर यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.
पोलीस व सैन्य दलाच्या जवानांच्या तुकडीने हवेमध्ये बंदुकीच्या फैरी झाडून आणि बँडपथकातर्फे अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यानंतर पत्नी पूजा, मुलगी स्वरांजली, आई सुशीला व भाऊ आनंदा यांनी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. शहीद शंकर उकलीकर यांची मुलगी स्वरांजली व भाऊ आनंदा यांनी पार्थिवाला मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार केले.