जीवनशैली

चळवळीतील नेतृत्व : मनोजदादा माळी

चळवळीतील नेतृत्व : मनोजदादा माळी
शेतकऱ्यांना, सर्वसामान्यांना तसेच गोरगरीब रुग्णांना आपल्या आंदोलनांच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणारे चळवळीतील नेतृत्व म्हणजे मनोजदादा माळी.. आज त्यांचा वाढदिवस समाजपयोगी कार्यक्रमातून साजरा होत आहे. मनोजदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा घेतलेला छोटासा आढावा…
समाजात वावरताना गोरगरिबांसह सर्वसामान्यांना प्रशासनाच्या अडमुठे धोरणाचा प्रचंड मनस्ताप होत असतो. कधी कोणाला वेळेवर उपचार मिळत नाहीत, तर कुणा शेतकऱ्याला न्याय मिळत नाही.. कधी फायनान्सच्या नावाखाली महिलांची फसवणूक केली जाते, तर कधी निकृष्ट दर्जाच्या रस्त्यातून जनतेला फसवलं जातं. मात्र समाजातील प्रत्येक उपेक्षितांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुखकर व्हावे यासाठी मनोज माळी हे चळवळीतील नेतृत्व त्यांच्या पाठीशी राहत. उपोषण, आंदोलन करत संबंधितांना न्याय देण्याचा प्रयत्न मनोजदादा करीत असतात. चळवळीतील या नेतृत्वाने अनेक उपेक्षितांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.
सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे कराडसह सातारा, सांगली, कोल्हापूर येथून रुग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. येथील उपजिल्हा रुग्णालयात येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना चांगल्या आरोग्य सेवा मिळावी, त्यांच्यावर चांगले उपचार व्हावेत यासाठी मनोजदादा यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. एवढ्या मोठ्या रुग्णालयात रुग्णांची काळजी व त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तज्ञ डॉक्टर तसेच आवश्यक स्टाफ नव्हता. त्यामुळे रुग्णांची येथे प्रचंड हेळसांड होत होती. यावर सामाजिक जाणवेतून मनोज माळी यांनी रुग्णालयाला तज्ञ डॉक्टर व स्टाफ वाढवून मिळावा यासाठी प्रशासनाविरोधातच आंदोलन उभे केले होते. रुग्णालयात सोनोग्राफी व सिटीस्कॅन मशीनसाठीही त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर व 200 बेडची मंजूरी मिळावी यासाठी मनोज माळी यांनी आंदोलन तर केलेच शिवाय मंत्रालय पातळीवर पाठपुरावा देखील केला.
कराड व मलकापूर परिसरात फायनान्सच्या नावाखाली गोरगरीब जनतेसह महिलांची मोठी फसवणूक होत होती. त्याच्याकडून आवाच्या सव्वा व्याज घेतले जात होते. यावर मनोज माळीयांनी स्वतः लक्ष घालून मायक्रो फायनान्स कंपन्यांविरोधात तोडफोड आंदोलन करून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
काही वर्षांपूर्वी ओगलेवाडी चौपदरी रस्ता नित्कृष्ठ झाल्याने काही दिवसातच तो रस्ता खचला होता, तेथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने त्या निकृष्ट रस्त्याच्या कामाविरोधात मनोज दादा यांनी आंदोलन उभारले.
शेतकऱ्यांचे विविध प्रश्न तसेच मागण्यांसाठी वेळोवेळी प्रशासनासह सरकारच्या विरोधात मनोज दादानी मोर्चा, निवेदने काढत चर्चेला वाटा मोकळ्या करून दिल्या. मनसे व प्रहारच्या माध्यमातून त्यांनी अनेक आंदोलने करून सामाजिक प्रश्नांची प्रशासनाला दखल घेण्यास भाग पाडले. सध्या आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली मनोजदादा माळी प्रहार मध्ये कार्यरत आहेत. चळवळीतील नेतृत्व असलेल्या मनोजदादा हे पक्ष, संघटना, आघाड्या यामध्ये अडकून न पडता प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी 24 तास उपलब्ध असतात. अशा या चळवळीतील नेतृत्वाला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा…
प्रविण शिंदे
अंतवडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »