जीवनशैलीमहाराष्ट्रशिक्षण

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटकडून जयवंत शुगर्सचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

कानपूर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत पुरस्कार प्रदान; साखर उद्योगातील मान्यवरांची उपस्थिती

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटकडून जयवंत शुगर्सचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
कानपूर येथे आंतरराष्ट्रीय परिषदेत पुरस्कार प्रदान; साखर उद्योगातील मान्यवरांची उपस्थिती
कराड : प्रतिनिधी –
भारत सरकारच्या खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. उत्तरप्रदेशातील कानपूर येथे आज झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जयवंत शुगर्सने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन साखरेच्या उत्पादनातील वाढ, अन्य उपपदार्थांची निर्मिती व वाढत्या साखर उताऱ्यात सातत्य राखून, अल्पावधीतच साखर उद्योगात उत्तुंग भरारी घेत आदर्श निर्माण केला आहे. साखर उद्योगाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी जयवंत शुगर्सने केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन, भारत सरकारच्या खाद्य व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने यंदाचा ‘उद्योग उत्कृष्टता पुरस्कार’ जयवंत शुगर्सला जाहीर केला होता.
उत्तरप्रदेशातील कानपूर येथे नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट व उत्तरप्रदेश शुगर मिल्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाचे प्रधान सचिव संजीव चोप्रा यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
जयवंत शुगर्सला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त होणे ही अभिमानाची गोष्ट असून, कारखान्याच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या सर्व सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व कामगार यांचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले व श्री. विनायक भोसले यांनी अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाला नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटचे संचालक नरेंद्र मोहन यांच्यासह विविध साखर उत्पादक देशांमधील ५०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »