विनायक भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
कोळे येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
विनायक भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
कोळे येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कराड : प्रतिनिधी –
येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्त कोळे येथील जिजाऊ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
घारेवाडी येथील अमित माने मित्र परिवार आणि विंग येथील संजय खबाले मित्र परिवाराच्यावतीने कोळे येथे श्री. भोसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त जिजाऊ वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कपडे व अन्य जीवनावश्यक साहित्य प्रदान करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर देण्यात आला.
याप्रसंगी अमित माने, संजय खबाले, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक सयाजी यादव, कृष्णा सहकारी बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य हेमंत पाटील, आणेचे सरपंच किसन देसाई, उमेश घारे, सुरेश घारे, पांडुरंग सावंत, राहुल चव्हाण, सदाशिव चव्हाण, साहेबराव देसाई, अमृत नेमाणे, विकास कदम, युवराज शिंदे, अधिक देसाई, धनाजी कणसे, प्रतापसिंह पवार, संजय तोडकर, सचिन देसाई, सुनील थोरात, राजाभाऊ खबाले, राहुल यादव, धनाजी पाटील, दादासो गरुड, अस्लम देसाई, श्रीरंग पाटील, अविनाश पाटील यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.