व्यवसाय

जनकल्याण पतसंस्था कराडची रुपये १००० कोटींच्या एकत्रीत व्यवसायाकडे वाटचाल : अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे

जनकल्याण पतसंस्था कराडची रुपये १००० कोटींच्या एकत्रीत व्यवसायाकडे वाटचाल : अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे
कराड : प्रतिनिधी –
जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराडची २८ वी वार्षीक सर्वसाधारण सभा कृष्णाबाई मंगल कार्यालय ( जुने ) कराड येथे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. सदर सभेच्या नोटीसचे वाचन व सुत्रसंचालन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक फडके यांनी केले. सभेसमोर ठेवलेल्या सर्व विषयांना सविस्तर विचार विनीमयाअंती सभासदांनी एकमताने मान्यता दिली.
३१ मार्च २०२३ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर संस्थेकडे ५३९ कोटींच्या ठेवी जमा झाल्या असून रुपये ३४२ कोटी इतकी कर्जे वितरीत केली आहेत. संस्थेचा एकत्रीत व्यवसाय ८८१ कोटी इतका झाला असून संस्थेने २९३ कोटी इतकी सुरक्षीत गुंतवणूक केली आहे. संस्थेस ३१ मार्च २०२३ अखेर रुपये ७ कोटी ०३ लाखाहून अधिक तरतूदीअंती नफा झालेला आहे. संस्थेने सहकारी पतसंस्थांच्या नियामक मंडळाने लागू केलेल्या सी.आर.आर., सी.आर.ए.आर. व अन्य अकौंटींग स्टँडर्ड मधील तरतूदींचे पालन केले असून संस्थेस सन २०२३ अखेर संपलेल्या आर्थीक वर्षाकरीता वैद्यानिक लेखापरीक्षकांकडून अ वर्ग मिळालेला आहे.
संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर देशपांडे यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेच्या प्रगतीचा व संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी जनकल्याण आता राज्यस्तरीय पतसंस्था झाली असल्याचे जाहीर केले. मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य, पुणे यांना याबाबत संस्थेस दिलेल्या पत्राचा उल्लेख केला. संचालक मंडळाने विचारपूर्वक सोनेतारण कर्जाच्या वितरणावर भर दिला असून ८.४५ टक्के दराने प्रोसेसींग फी विरहीत कर्ज योजना आणली असल्याने अहवाल वर्षात या योजनेस कर्जदार ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले. संचालक मंडळाने व्यवसाय वाढीसाठी मार्केटींगचे महत्व लक्षात घेऊन विविध माध्यमातून जाहीरात केली जात असल्याचे सांगितले.
सातारा आकाशवाणी केंद्रावर दर सोमवारी सकाळी ८.२५ मिनीटांनी जनकल्याणचा प्रायोजीत कार्यक्रम सुरु केला असल्याचे सांगत सभासदांना सदर कार्यक्रम ऐकण्याची विनंती केली तसेच या संदर्भात काही सूचना करायच्या असतील तर संस्था त्याचे स्वागत करेल असे नमूद केले. संस्थेने व्यवसाय विस्तार करण्याच्या दृष्टीने अहवाल अहवाल कालावधीत जयसिंगपूर, विटा शाखा सुरु केल्याचे सांगत या शाखांना दिलेल्या उत्तम प्रतिसादाबाबत तेथील सभासद ग्राहकांचे आभार मानले. संस्थेची १७ वी शाखा लवकरच चाकण येथे सुरु होणार असून सभासदांनी चाकण भागातील आपल्या नातेवाईक अगर स्नेहींना चाकण शाखेत व्यवहार करण्यासाठी उद्युक्त करावे अशी विनंती केली. तसेच सन २०२३-२०२४ मध्ये आणखी ४ शाखा ग्राहकांच्या सेवेत रुजू व्हाव्यात या करीता संचालक मंडळ प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्राहकांच्या व्यवहारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देताना अत्याधुनिक क्लाऊड बेस्ड टेक्नॉलॉजीचा अंगिकार करुन त्यावर आधारीत डिझास्टर रिकव्हरी सेंटरची उभारणी केली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. संस्थेच्या सभासद संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असली तरी संपलेल्या आर्थिक वर्षाकरीता सभासदांना १० टक्के एवढा डिव्हीडंड दिला जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. सभासदांच्या पाठींब्यामुळे संस्थेचा एकत्रीत व्यवसाय रुपये १०० कोटींच्या समीप आहे, सभासदांनी गेली २८ वर्ष संस्थेच्या संचालक मंडळावर दाखविलेल्या विश्वास व दिलेल्या पाठींब्याबद्दल त्यांनी सभासदांचे आभार व्यक्त केले. तसेच संचालक मंडळाने दिलेल्या योगदानाबद्दल संचालक मंडळाचे देखील आभार मानले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. मिलींद पेंढारकर, संचालक डॉ. प्रकाश सप्रे, डॉ. अविनाश गरगटे, सी.ए. शिरीष गोडबोले, एकनाथ फिरंगे, हिंदुराव डुबल, जितेंद्र शहा, मोहन सर्वगोड, सौ. वर्षा कुलकर्णी, सौ. पुनम वास्के, दिपक जोशी, प्रविण देशपांडे, अभिजीत चाफेकर, सुनिल कुलकर्णी, सी.ए. आशुतोष गोडबोले, अशोक आटकर उपस्थित होते.
संस्थेच्या संचालिका सौ. पुनम वास्के यांनी सभेस उपस्थित संस्थेचे सर्व सभासद, सल्लागार, कायदेविषयक सल्लागार, मूल्यांकनकार, कर्मचारी तसेच सभा व्यवस्थित संपन्न होण्यासाठी ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »