व्यवसाय

कृष्णा कारखाना देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना बनेल : डॉ. सुरेश भोसले

कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

कृष्णा कारखाना देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना बनेल : डॉ. सुरेश भोसले
कृष्णा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात
कराड : प्रतिनिधी – : कृष्णा कारखान्याच्या आधुनिकीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. आधुनिकीकरणामुळे प्रतिदिन गाळप क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. या आधुनिकीकरण व विस्तारीकरणाचा लाभ सभासद शेतकर्‍यांना होणार असून, लवकरच कृष्णा कारखाना देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना बनेल, असा विश्वास चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी व्यक्त केला. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर आमदार मोहनराव कदम, माजी आमदार भगवानराव साळुंखे, कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले, कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजीराव पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, सौ. जयश्री पाटील, सौ. इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दिपक पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सी. एन. देशपांडे, कार्यकारी संचालक राम पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
सभेला संबोधित करताना चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, शेतीमध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब मोठ्याप्रमाणात होत असून, अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे शेतावर औषध फवारणी होत आहे. त्यामुळे कृषी उद्योगात आधुनिकीकरणाला मोठे महत्व आले आहे. कृष्णा कारखान्याच्या सभासदांच्या हितासाठी गेल्या सभेत आम्ही कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा व विस्तारीकरणाचा संकल्प सोडला. अवघ्या वर्षभरात योग्य नियोजनामुळे हे काम पूर्णत्वास गेले असून, वाढीव गाळप क्षमतेसह आपला कारखाना लवकरच गाळपासाठी सज्ज होणार आहे. या वाढीव क्षमतेचा फायदा कारखान्याच्या सभासदांना होणार आहे. केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी साखर कारखान्यांचा इन्कमटॅक्स कायमस्वरुपी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन, साखर कारखानदारीला मोठा दिलासा दिला आहे. कृष्णा कारखान्याने नेहमीच नवनवीन संकल्पनांना प्रोत्साहन दिले असून, कृष्णा कारखानानिर्मित जिवाणू खते भविष्यात देश व राज्यातील शेतकर्‍यांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, डॉ. सुरेशबाबांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने वर्षभरात जलदगतीने कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पूर्ण केले आहे. यामुळे कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन १२ हजार मेट्रीक टनापर्यंत वाढणार आहे. या गळीत हंगामात प्रत्येक ठिकाणी दीडपट तोडणी यंत्रणा देण्याचा कारखान्याचा प्रयत्न असून, सभासद कल्याण हे एकमेव उद्दिष्ट ठेवून संचालक मंडळ काम करत आहे. त्यामुळे कृष्णा कारखाना बळकट करण्यासाठी संचालक मंडळास सभासदांनी भरघोस सहकार्य करावे.
व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक राम पाटील यांनी नोटीसीचे वाचन व मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून दाखविला. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले. यावेळी इस्लामपूरचे उपनगराध्यक्ष दादा पाटील, माजी नगराध्यक्ष भगवानराव पाटील, माणिकराव पाटील, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, राजू मुल्ला, कराडचे माजी नगरसेवक सुहास जगताप, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, संचालक ब्रिजराज मोहिते, माजी संचालक पांडुरंग होनमाने, ब्रम्हानंद पाटील, महिपतराव पाटील, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, प्रकाश पाटील, शिवाजीराव जाधव, तानाजी मोरे, अरविंद पाटील, संग्राम पाटील, राहुल पाटील, रामभाऊ माळी, वैभव जाखले, मनोज पाटील, संभाजीराव निकम, विश्वास पाटील, आप्पासो पाटील यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »