कोयना बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
कोयना बँकेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
बँकेची मोबाईल बैंकिंग (IMPS) आणि UPI सेवा सुरु
कराड : प्रतिनिधी-
कोयना सहकारी बँकेची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मार्केट यार्ड कराड येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. सभेच्या अध्यक्ष स्थानी बँकेचे चेअरमन रोहित पाटील हे होते. बँकेचे संस्थापक व रयत सह साखर कारखान्याचे चेअरमन अॅड उदयसिंह पाटील, रयत कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासो गरुड, कोयना दूध संघाचे चेअरमन लक्ष्मण देसाई, व्हा. चेअरमन शिवाजीराव जाधव, माजी चेअरमन वसंतराव जगदाळे, संपतराव इंगवले, कराड तालुका सह. खरेदी विक्री संघाचे चेअरमन अनिल मोहिते, व्हा. चेअरमन जगन्नाथ मोरे, माजी चेअरमन रंगराव थोरात, हणमंतराव चव्हाण (साजुरकर), शामराव पाटील पतसंथेचे चेअरमन बळवंत पाटील, व्हा, चेअरमन तानाजी पाटील, माजी चेअरमन सर्जेराव थोरात, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम, उपसभापती संभाजी चव्हाण, प्रा. धनाजी काटकर, अथनी शुगर युनिट प्रमुख रविंद्र देशमुख, अँड आर सी शहा, सीए तानाजीराव जाधव, जि. प. सदस्य प्रदिप दादा पाटील, कराड पंचायत समितीच्या माजी सभापती फरिदा इनामदार, पं.स. माजी सदस्य काशिनाथ कारंडे, राजूभाई मुलाणी, निवासराव निकम, विलासराव पाटील (पोतलेकर), बँकेचे सर्व संचालक तसेच
कोयना – रयत समुहातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, समासद यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना बँकेचे संस्थापक अध्यक्ष अॅड. उदयसिंह पाटील यांनी कोयना बँकेची सभा नेहमीच अत्यंत खेळीमेळीने पार पडत आहे याबद्दल सर्व सभासदांचे आभार मानले. आर्थिक व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य शेतकरी, अल्पभूधारक, ज्यांना पत नाही अशा लोकांना बँकिंग क्षेत्रात आणून पत उभी करणे हे स्व. काकांचे ध्येय होते. प्रस्थापीत मंडळींकडून सर्वसामान्य मानूस, शेतक-याची पिळवणूक व्हायची. त्यांच्यासमोर गुलाम बनून जावे लागत होते. ही पिळवणूक थांबावी या हेतूने कोयना बँकेची स्थापना झाली. स्व. काकानी एकाच पक्षाची विचारधारा जोपासली. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक देशातील अग्रगण्य बँक म्हणून नावाजली जात आहे. त्याचा पाया भरताना काकांनी योगदान दिले त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये कोयना बैंक, कोयना दूध संघ, खरेदी विक्री संघ, रयत साखर कारखाना, शामराव पाटील पतसंस्था, कराड शेती उत्पन्न बाजार समिती इ संस्थामध्येही सर्वसामान्य मानसांचे नेतृत्व देण्याचे काम करून सर्वसामान्यांच्या हिताचे रक्षण केले आहे.
सांगण्यास अभिमान वाटतो की, चालू हंगामात गळीपासाठी तयार होत असलेल्या शिवनेरी शुगर्स, रहिमतपूर या कारखान्याच्या उभारणीत कोयना बँक लिड बँक म्हणून काम करत आहे हा बँकेच्या इतिहासातील मैलाचा दगड आहे. संस्था, संस्कृती विचारावर अवलंबून आहेत आणि विचाराचे रक्षण करणे एकट्याचे काम नसून स्व. काकांच्या पाश्चात आपण सर्वांनी जी साथ दिली. विश्वास दाखवला यामुळे यापुढेही अशी आव्हाने आशाने पेलू अशी ग्वाही यावेळी दिली. बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील म्हणाले. माजी सहकार मंत्री, लोकनेते स्व. विलासरावजी पाटील (काका) तसेच
संस्थापक अध्यक्ष मा. अॅड श्री उदयसिंह पाटील (दादा) यांचे मार्गदर्शनाखाली बँकेचे सर्व सभासद, ठेवीदार, ग्राहक व
हितचिंतक या सर्वाच्या सहकार्याने व विश्वासाने कोयना बँकेच्या प्रगतीची वाटचाल चालू आहे. बँकेच्या ठेवी, कर्ज, निधी,
नफा इ. मध्ये गतवर्षीचे तुलनेने वाढ झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी बँकेच्या ठेवी रु. १७१.३६ कोटी, कर्ज रु. ११३.१६ कोटी निधी रु. १४.६९ कोटी तर निव्वळ नफा रु. 96.38 लाख एवढा झाला आहे. बँकेने दिलेल्या कर्जाच्या ढोबळ एन पी ए चे प्रमाण ४.८3 % व नेट NPA शुन्य टक्के इतके आहे. बँकेने मोबाइल बैंकिंग सुविधा कार्यान्वित केली असून UPI, IMPS या सुविधेचा लाभ बैंकच्या खातेदारांनी घ्यावा व घरबसल्या अधुनिक बैंकिंग सुविधांचा लाभ घ्यावा असे अवाहन केले. तसेच बँकेच्या संचालक मंडळाने चालू वर्षीही गतवर्षीप्रमाणे लाभांश (डिव्हीडंट) देणेची शिफारस केली असून रौप्य महोत्सवानिमित्त सभासदांना भेट वस्तू देणेचा मा. संचालक मंडळाचा मानस आहे. बँकेची मलकापूर शाखा स्थलांतर समारंभ कराड-डेबेवाडी रोड, आगाशिवनगर येथे बुधवार दिनांक २७/०२/२०२३ रोजी सकाळी १०.३० वाजता बँकेचे संस्थापक अॅड. उदयसिंह पाटील यांचे शुभहस्ते आयोजित केला असून समारंभास बँकेचे सभासद, खातेदार, हितचिंतक यांनी उपस्थित रहावे असे अवाहन केले.
प्रास्ताविक बँकेचे संचालक राजेंद्र पाटील यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जनार्दन माने यांनी अहवाल वाचन केले. सभेचे सर्व विषय एकमताने मंजूर केले. व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सुनिल बोटलवार यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले. यावेळी प्रा. धनाजी काटकर, सीए तानाजीराव जाधव, अथनी शुगर्सचे युनिट प्रमुख रविंद्र देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. श्रद्धांजली ठराव संचालक जयवंत शिबे यांनी मांडला. यावेळी गुणवंत पाल्यांचा सभे मध्ये सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शन अजित पाटील-आटकेकर यांनी केले.