“स्वच्छ पंधरवडा” व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत सुरक्षा साधने प्रदान
“स्वच्छ पंधरवडा” व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत सुरक्षा साधने प्रदान
कराड:प्रतिनिधी –
इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत “स्वच्छ पंधरवडा” व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. श्रीनिवास पाटील साहेब यांच्या हस्ते आज सुरक्षा साधने प्रदान करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान २.० (नागरी) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या इंडियन स्वच्छता लीग 2.0 अंतर्गत “स्वच्छ पंधरवडा” व स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत मोहिम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कराड नगरपरिषदेमार्फत 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधी मध्ये सदर अभियान राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने आज दि. 25/09/23 रोजी,सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. श्रीनिवास पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते , कराड नगर परिषद कराड येथे न. प.सफाई कर्मचाऱ्यांना “सफाई मित्र सुरक्षा अभियान” व “स्वच्छता ही सेवा” अभियान अंतर्गत सुरक्षा साधने प्रदान करण्यात आली. सफाई कर्मचारी हे कोणतीही काळ वेळ न पाळता, कोणत्याही आपत्तीची पर्वा न करता 24×7 शहर स्वच्छतेचे काम करत असतात. त्यांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. त्याचाच एक भाग म्हणून कराड न.प. च्या सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा बूट, सुरक्षा हेल्मेट, रिफ्लेकटिंग जॅकेट व सुरक्षा हातमोजे देण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी श्रीमती विशाखा पवार , आरोग्य अभियंता श्री आर. डी. भालदार , नगर अभियंता श्री आर. डी. गायकवाड, जलनिस्सारण अभियंता श्री.ए.आर.पवार , सहायक नगर रचनाकार श्रीमती अंकीता पवार ,कर विभागप्रमुख श्री उमेश महादर, शहर समन्वयक अशिश रोकडे तसेच कराड न.प. चे सर्व अधिकारी, मुकादम व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.