पर्यावरण संवर्धनातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड : पाशा पटेल

पर्यावरण संवर्धनातून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणारी बांबू लागवड : पाशा पटेल
कराड येथे क्षेत्रीय अधिकारी, शेतकरी बांबू लागवड कार्यशाळा उत्साहात
कराड : प्रतिनिधी-
संपूर्ण देशभरातून बांबू लागवड उपक्रमाकरिता प्रायोगिक तत्वावर सातारा जिल्हा निवडला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून शासकीय योजनेचा लाभ घ्यावा. बांबू लागवडीतून ग्लोबल वार्मिंगच्या धोक्यापासून बचाव करण्याबरोबरच शेती पूरक व्यवसायातून आर्थिक स्थैर्याकडे वाटचाल करावी, असे आवाहन कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे.
कराड आणि पाटण तालुका पंचायत समिती यांच्यावतीने क्षेत्रीय अधिकारी व शेतकरी यांच्यासाठी बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पाशा पटेल बोलत होते. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, रोहयो जिल्हा कृषी अधिकारी श्री शेळके, तालुका कृषी अधिकारी खरात, मुल्ला, सहाय्यक गट विकास अधिकारी विजय विभुते, वाघ, विशेष कार्यसन अधिकारी बिभवे, सरपंच परिषद अध्यक्ष जितेंद्र भोसले, शेती उत्पन्न बाजार समिती संचालक सतीश इंगवले सामाजिक वनीकरण विभागाच्या श्रीमती शिरगावे व जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.






