दादासाहेब मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिक्षांत समारंभ पार पडला
दादासाहेब मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दिक्षांत समारंभ पार पडला
कराड: प्रतिनिधी –
मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचलित व डी.जी.ई.टी. नवी दिल्ली व डी. व्ही.ई.टी. मुंबई महाराष्ट्र शासन मसन्यता प्राप्त दादासाहेब मोकाशी औद्योगिक प्रशिक्षण (आय.टी.आय) संस्थेमध्ये रविवार दिनांक १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता शैक्षणिक वर्ष २०२१ २०२३ मधील उत्तीर्ण बॅचच्या विद्यार्थ्यांचा दिक्षांत समारंभ पार पडला. या समारंभासाठी इलेक्ट्रीशन,फिटर व ड्राफ्ट्समन सिव्हिल ट्रेडचे सर्व यशवंत विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात फोटोपूजन व दिपप्रज्वलनाने करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे महापारेषण विभाग, ओगलेवाडी चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. श्रीकांत धोकटे सर व श्री. रेफ्रिजरेशनचे फॅक्टरी मॅनेजर श्री. गायकवाड सर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फिटर ट्रेड मधील ओंकार भगवान मोहिते, हर्षद हणमंत अर्जुगडे व सौरभ तानाजी गोरे यांना पदवी व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच इलेक्ट्रीशियन ट्रेड मधील ओंकार प्रकाश नलवडे, प्रसाद शंकर पानस्कर, वैष्णव रामचंद्र जगताप व सुशिल दादासो बरकडे यांना पदवी व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच डा. सिव्हिल ट्रेड मधील अक्षय किरान थोरात, स्वरूप घनश्याम लादे व सुय संजय कांबळे यांना पदवी व मानचिन्ह प्रदान करण्यात आले. तसेच इतरही विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करून गौरविण्यात आले. आय. टी. आय विभागातील विद्यार्थ्यांचे कौतुक व सत्कार करण्याचा हा कार्यक्रम विश्वकर्मा दिनानिमित्त संपूर्ण भारतभर आयोजित करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. अभिजीत मोकाशी उपाध्यक्ष डॉ. विश्वजीत मोकाशी व संचालक श्री. विलास चौधरी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्या सौ. एस. एम. पवार मॅडम यांनी मुलांकडून भविष्यामध्ये पदवीप्रदान क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या.