श्री कालिकादेवी पतसंस्थेतर्फे १५ टक्के लाभांश जाहीर संसथेचे अध्यक्ष गजानन (बाळासाहेब) मोहिरे यांची माहिती; संस्थेचा २५५ कोटींचा एकत्रीत व्यवसाय
श्री कालिकादेवी पतसंस्थेतर्फे १५ टक्के लाभांश जाहीर संसथेचे अध्यक्ष गजानन (बाळासाहेब) मोहिरे यांची माहिती; संस्थेचा २५५ कोटींचा एकत्रीत व्यवसाय
कराड : प्रतिनिधी-
श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, कराड या संस्थेच्या विद्यमान सभासदांची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मा. चेअरमन साहेब गजानन (बाळासाहेब) बंडोबा मोहिरे यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडली. श्री कालिकादेवी नागरी सहकारी पतसंस्थेला या वर्षात रु. २ कोटी ५१ लाख ५८ हजारचा निव्वळ नफा झाला असुन सभासदांना १५% लाभांश जाहीर करुन सदरचा लाभांश सभासदांच्या सेव्हिंग्ज ठेव खात्यावर आज जमा होत असल्याचे सांगितले. चेअरमन गजानन मोहिरे म्हणाले, कुटुंब प्रमुख मुनिर बागवान (सावकार) यांच्य मार्गदर्शनाखाली संस्थेने २५५ कोटींचा एकत्रीत व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. सहकार क्षेत्रात संस्थेने भरीव अशी प्रगती केलेली आहे. सहकार हे शोषण टाळणारे क्षेत्र आहे. सहकारातील फायदा हा सभासदांचा असतो हे सहकाराचे वेगळेपण आहे. संस्थेने सभासदांच्या हितासाठी आतापर्यंत अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत. संस्थेच्या सभासदांच्या ठेवींना भविष्यात संरक्षण मिळावे यासाठी नफ्यातून तरतुद करीत असल्याचे सांगुन असा निर्णय घेणारी श्री कालिकादेवी पतसंस्था ही पश्चिम महाराष्ट्रातील १ ली पतसंस्था आहे असे संस्थेचे कुटुंबप्रमुख मुनीर बागवान (सावकार) व संस्थेचे कार्यलक्षी संचालक विवेक वेळापुरे यांनी सांगीतले.
सभासदांच्या स्वमालकीच्या कराड व सातारा येथील स्ववास्तुत सभासदाच्या सोयीसाठी सी.बी.एस संगणक प्रणाली सुरु केली आहे. सभासदांना याद्वारे एस. एम. एस बँकिंकची सुविधा, आर.टी.जी.एस. एन.ई.एफ.टी, ऑनलाईन स्टॅम्प ड्युटी, जीएसटी चलने, लॉकर अशा सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत.
सभेस उपाध्यक्ष अनिल सोनवणे, संचालक अरुण जाधव, प्रा. अशोक चव्हाण, डॉ. संतोष मोहिरे, राजन वेळापुरे, डॉ. जयवंत सातपुते, शरदचंद्र देसाई, राजेद्रकुमार यादव, सुरेश भंडारी, श्रीमती जयाराणी जाधव, सौ. सीमा विभुते, तज्ञ संचालक सुरेश कोळेकर तसेच सातारा शाखा सल्लागार औदुंबर कासार, सी. ए. शिरीष गोडबोले, संस्थापक संजय मोहिरे व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.