कराड उत्तरचे ‘ भाग्यविधाते ‘ सह्याद्रिचे ‘ संस्थापक ‘ आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अभिवादन
कराड उत्तरचे ‘ भाग्यविधाते ‘ सह्याद्रिचे ‘ संस्थापक ‘ आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज श्री. शिवाजी विद्यालय, कराड येथील त्यांच्या समाधीस्थळी, आदरणीय पी डी पाटील साहेब प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय आमदार श्री बाळासाहेब पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी त्यांच्यासमवेत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ.अशोकराव गुजर, कारखान्याचे संचालक जशराज पाटील (बाबा), प्रतिष्ठानचे विश्वस्त ॲड. मानसिंगराव पाटील, राजेंद्र वसंतराव माने, डॉ. विजयकुमार साळुंखे, आनंदराव साळुंखे, मुकुंदराव कुलकर्णी, प्रा. रामभाऊ कणसे,अमोल सोनवणे, सौ. रेश्मा कोरे सौ.शोभा पाटील, ए. एन. मुल्ला, संभाजी पाटील, प्रकाश पवार, अबूबकर सुतार व इतर मान्यवर उपस्थित होते.