काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस कराड उत्तरमध्ये उत्फुर्त प्रतिसाद
काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेस कराड उत्तरमध्ये उत्फुर्त प्रतिसाद
कराड:प्रतिनिधी –
काँग्रेसच्या जनसंवाद पदयात्रेला कराड उत्तर मध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेस कार्यकर्त्यांसह युवक युवती, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी झाले होते. माजी मुख्यमंत्री तथा आ. पृथ्वीराज चव्हाण आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि जनसंवाद यात्रा काढण्यात आली. कराड उत्तर मधील पदयात्रेचे आयोजन कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी केले होते, यांच्यसह या पदयात्रेमध्ये सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश प्रतिनिधी अजितराव पाटील, जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अल्पनाताई यादव, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमित जाधव, कॅप्टन इंद्रजित जाधव, मोहनराव माने, माजी सभापती मारुतराव थोरात, वसंत पाटील, उमेश मोहिते, अमित जाधव, अनिल मोहिते, निवासराव निकम, यशवंत चव्हाण, प्रताप देशमुख, दीपक शिंदे,संग्राम पाटील, सौ. अर्चना कोरे, अतुल थोरात, शिवराज पवार, शैलेश चव्हाण, अजित केंजळे, प्रताप पवार, चंद्रकांत साळुंखे, संजय घाडगे, संग्राम पवार, प्रशांत यादव, दिलीप साळुंखे आदी यावेळी उपस्थित होते.
कराड उत्तर मधील पदयात्रेची सुरुवात ऐतिहासिक अशा तळबीड गावातून स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीचे दर्शन घेऊन करण्यात आली. हि यात्रा तळबीड मधून बेलवडे ह. तासवडे, वराडे येथून उंब्रज येथे पोहचली तेथे मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून हि यात्रा पुढे निघाली तेथून हिंगनोळे, इंदोली, वडगाव, पाल येथे पोहचली व येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री खंडोबा देवाचे दर्शन घेऊन पुढे काशीळ येथे पोहोचली, तेथून पेरले, भुयाचीवाडी, कोर्टी, भोसलेवाडी, शिवडे येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली. या पदयात्रेचे ठिकठिकाणी व गावागावात नागरिकांनी उत्साहाने स्वागत केले. नेतेमंडळींनी सुद्धा गावागावातून ग्रामस्थांशी संवाद साधला.