श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडमध्ये प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशाची अंतिम सुवर्णसंधी
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराडमध्ये प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशाची अंतिम सुवर्णसंधी
कराड : प्रतिनिधी-
यशवंत विद्यापीठ कराड संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराड येथे डिप्लोमा इंजिनिअरींग प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी अंतिम कॅप राऊंडनंतर रिक्त राहिलेल्या जागांवर थेट प्रवेशाची अंतिम संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. यामध्ये डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरींग, आर्किटेक्चर, सिव्हील, इलेक्ट्रीकल व मेकॅनिकल इंजिनिअरींग हे कोर्सेस उपलब्ध आहेत. सदरहु तंत्रनिकेतन हे 1983 पासून सुरु आहे.
दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकालही नुकताच जाहीर झालेला आहे व आयटीआय 2023 चा निकालही नुकताच जाहीर झालेला आहे या पात्र विद्यार्थ्यांना चालु शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये डिप्लोमा प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशाची अंतिम संधी उपलब्ध आहे. वरील सर्व कोर्सेसना माफक फीमध्ये प्रवेश उपलब्ध आहेत. तरी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी त्वरित तंत्रनिकेतनमध्ये सपंर्क साधावा व आपला प्रवेश निश्चित करावा असे आवाहन संस्थेमार्फत संस्थापक सेकेटरी श्री.बी.टी. किणीकर सर व प्राचार्य स्वागत सर यांनी केले आहे.