मनोरंजन

शाहरुखच्या ‘जवान’शी भिडणार रजनीकांतचा ‘जेलर’; ओटीटीवर होणार रिलीज!

शाहरुखच्या ‘जवान’शी भिडणार रजनीकांतचा ‘जेलर’; ओटीटीवर होणार रिलीज!
‘थलायवा’ रजनीकांत स्टारर ‘जेलर’ या चित्रपटाने भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. ‘जेलर’ हा जगातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट ठरला आहे. आता या चित्रपटाच्या आणि रजनीकांत यांच्या चाहत्यांसाठी एका आनंदाची बातमी समोर आली आहे. जर, काही कारणास्तव तुम्ही हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये पाहू शकला नसाल, तर आता तुम्हाला तो घरबसल्या पाहता येणार आहे. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार आहे. नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित रजनीकांत अभिनीत ‘जेलर’ हा चित्रपट ७ सप्टेंबरपासून प्राईम व्हिडीओवर बघता येणार आहे. याच दिवशी शाहरुख खानचा ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे.

प्राईम व्हिडीओवर चाहते ‘जेलर’ हा चित्रपट तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये पाहू शकता. ‘जेलर’ रिलीज होऊन २० दिवस उलटूनही हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल चालू आहे. ‘जेलर’ चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ३०० कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि जगभरात या चित्रपटाने ६५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. सन पिक्चर्सच्या बॅनरखाली कलानिती मारन निर्मित या चित्रपटाचे लेखनही नेल्सन यांनीच केले आहे.
‘जेलर’ या चित्रपटामध्ये रजनीकांत यांच्यासोबत रम्या कृष्णन, योगी बाबू, विनायकन, तमन्ना भाटिया आणि मास्टर रित्विक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर, मोहनलाल, शिव राजकुमार आणि जॅकी श्रॉफ यांनी चित्रपटात कॅमिओ भूमिका केल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. रजनीकांतही या चित्रपटाच्या यशाने खूप उत्साहित आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीन आठवडे उलटूनही रजनीकांत आपल्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. त्यांनी प्रमोशनमध्ये कोणतीही कसर सोडलेली नाही. गेल्या आठवड्यात रजनीकांत यांनी बंगळुरू येथील बस डेपोला भेट दिली होते. हा तोच बस डेपो होता, जिथे ते कधीकाळी बस कंडक्टर म्हणून काम करत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »