मुंबई : प्रतिनिधी-
जागतिक बाजारातील मजबूत संकेतांमुळे मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टीने पुन्हा भरारी घेत तेजी नोंदवली. सेन्सेक्स आज 79 अंकांनी वाढून 65,075 वर बंद झाला. तर निफ्टी 34 अंकांच्या वाढीसह 19,339 वर स्थिरावला. आज मेटल, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी 1 टक्क्यांनी वाढले. तर पीएसयू बँक, एफएमसीजी आणि फार्मा शेअर्समध्ये विक्री दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक प्रत्येकी 0.5 टक्क्यांनी वाढले. सेन्सेक्स आज 65201 वर खुला झाला होता. त्यानंतर तो 65229 पर्यंत वाढला. पण बाजार बंद होताना ते 65 हजारांच्या खाली घसरला. सेन्सेक्सवर जियो फायनान्सियलचा शेअर सर्वाधिक सुमारे 5 टक्क्यांनी वाढला. टाटा स्टील, एनटीपीसी, जेएसडब्ल्यू स्टील, पॉवर ग्रिड हे शेअर्स 1 ते 2 टक्क्यांपर्यंत वाढले. एचसीएल टेक, अल्ट्राटेक, एलटी, एचडीएफसी बँक, एम अँड एम, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स हे शेअर्सही वधारले. तर भारती एअरटेल, हिंदुस्तान युनिलिव्हर, अॅक्सिस बँक, रिलायन्स हे शेअर्स सुमारे 1 टक्क्यांनी घसरले.