‘कृष्णा-कोयना’ पतसंस्थेकडून दहा टक्के लाभांश
‘कृष्णा-कोयना’कडून दहा टक्के लाभांश
कराड : प्रतिनिधी –
कृष्णा कोयना नागरी सहकारी पतसंस्थेची मार्च २०२३ अखेर १८२ कोटी ७५ लाखाची व्यवसायपूर्ती झाली असून सभासदांना १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी घोषणा पतसंस्थेचे चेअरमन बाळासो पाटील यांनी केली.
सातारा जिल्हा कार्यक्षेत्र असणाऱ्या कृष्णा कोयना नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा अर्बन शताब्दी हॉलमध्ये झाली. यावेळी व्हा. चेअरमन सचिन चव्हाण, महाव्यवस्थापक संचालक आनंदराव पाटील, सुरेश शिंदे, अभय धोपटे, दत्तात्रय कलबुर्गी, प्रकाश पाटील, सुभाष काळे, प्रशांत पाटील, यशवंत ढेबे, महेश कांबळे, रोहिणी लाखोले, श्वेता पाटील,
लेखापरीक्षक के. एल. सावंत उपस्थित होते.
सभेचे नोटीस वाचन अरुण पाटील यांनी केले. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
अरुण पाटील म्हणाले, संस्थेचे कार्यक्षेत्र सातारा जिल्हा असून संस्थेच्या ९ शाखा व मुख्य कार्यालय कार्यरत आहे. संस्थेस सन २०२२-२३ आर्थिक वर्षात १ कोटी ६७ लाखाचा ढोबळ नफा झाला आहे. आवश्यक तरतुदी करून निव्वळ नफा १ कोटी २२ लाख इतका झाला आहे. संस्थेने सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला आहे. तसेच संस्थेचा एकत्रित व्यवसास १८२ कोटी ७५ लाखांचा झाला आहे. संस्थेने १०१ कोटी ठेवीचा ठप्पा पूर्ण केला आहे. आभार विजय शिंदे यांनी मानले.