मनोरंजन
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाचे मुंबई, पुण्यातील सगळे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाचे मुंबई, पुण्यातील सगळे प्रयोग ‘हाऊसफुल्ल’
मुंबई : सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनलेले नाटक म्हणजे अद्वैत दादरकर, रणजित पाटील दिग्दर्शित ‘जर तर ची गोष्ट’. सोनल प्रॉडक्शन निर्मित, इरावती कर्णिक लिखित या नाटकाने सध्या सर्व नाट्यगृहांबाहेर ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड झळकळवला आहे. ५ ऑगस्टपासून नाट्यरसिकांच्या भेटीला आलेल्या या नाटकाने आतापर्यंत सुमारे १५ प्रयोग केले असून हे सर्व प्रयोग हाऊसफुल्ल गेले आहेत. यावरूनच हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याची पोचपावती.