लिबर्टी मजदूर मंडळाच्या खेळाडूंचे यश
लिबर्टी मजदूर मंडळाच्या खेळाडूंचे यश
कराड : प्रतिनिधी –
खंडाळा तालुक्यातील बोरी येथे दोन दिवसीय भव्य कबड्डी स्पर्धा मोठा उत्साहात पार पडल्या. या कब्बडी स्पर्धेमध्ये कराड येथील लिबर्टी मजूर मंडळाने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे.
कबड्डी स्पर्धा आयोजित केल्या होत्या यामध्ये एकूण 16 कबड्डी संघाने सहभाग घेतला होता. यामध्ये लिबर्टी मजदूर मंडळाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक व अतिशय चांगला खेळ खेळून पहिले दोन सामने एकतर्फी विजय संपादन केला. दरम्यान सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. यावेळी लिबर्टी मजदूर मंडळाच्या खेळाडूंचा सामना अलिबाग या संघाशी झाला.
लिबर्टी मजूर मंडळाच्या संघात संकेत पाटील, योगेश पाटील, धनराज शेटे,अक्षय पाटील, निषाद पाटील, अभिनंदन कालेकर, मन्सूर मुजावर, साहिल फरांदे, दर्शन हंद्राळ या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षक म्हणून भास्कर पाटील, राम चौगुले यांनी काम पाहिले आहे.
कबड्डी स्पर्धेमध्ये नेत्रदीपक व यशस्वी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण मिणीयार, उपाध्यक्ष अरुण जाधव, मानसिंगराव पाटील, सचिव रमेश जाधव, काशिनाथ चौगुले, मुनीर बागवान, सचिन पाटील, विजय गरुड, राजेंद्र जाधव,दादा पाटील, यांच्यासह सर्व संचालकांनी अभिनंदन केले आहे.